esakal | अनलॉक होताच अनेकांना पर्यटनाची ओढ, प्रवासाच्या नियमांची चौकशी अन् बुकींगमध्ये अचानक वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनलॉक होताच अनेकांना पर्यटनाची ओढ, प्रवासाच्या नियमांची चौकशी अन् बुकींगमध्ये अचानक वाढ

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : सध्या कोरोनाचे रुग्ण कमी (corona cases decrease) झाल्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये अनलॉक (unlock India) सुरू झाले आहे. अनेकजण लॉकडाउनमध्ये घरात राहून कंटाळल्याने आता फिरायला जायचे प्लॅन करत आहेत. ट्रॅव्हल आणि टूरीझम विभागाकडे जून महिन्यासाठी मर्यादीत बुकींग असल्या तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक आहेत. त्यासाठी आतापासून चौकशी करणे सुरू झाले असून गेल्या आठ दिवसांमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. (booking and travel enquries increased as unlock start in india)

हेही वाचा: लाॅकडाउनला कंटाळात, फिरायला जायचा प्लॅन आहे? मग, सिंगापूरला जरुर भेट द्या..

अनेक राज्यांमध्ये ट्रॅव्हल गाइडलाइन्स काय आहेत? याबाबत सर्वाधिक विचारण केली जाते. गोव्याला जायचं असेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचे सर्टीफिकेट किंवा कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच हिमाचलकप्रदेशात जायचं असेल तर ई-पास आणि निगेटिव्ह आरटीपीआर चाचणी गरजेची आहे. उत्तराखंडमध्ये पोहोचताच महाराष्ट्र, केरळ, पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटकामधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. याबाबत चौकशी केली जात असून गेल्या आठवड्यापासून जवळपास ४० टक्के लोकांनी विचारणी केली आहे.

थॉमस कूक इंडियाच्या वेबसाइटला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जून महिन्यामध्ये ३३ टक्क्यांनी वाढली आहे. फक्त आठवड्यामध्ये ही वाढ झाली आहे. अनेकांनी लडाख आणि काश्मीरबाबत विचारणा केल्याचे दिसून येत आहे. तरुण वर्ग तसेच कौटुंबिक पिकनिकसाठी जयपूर, चंदीगड, लखनौ हे प्रसिद्ध बाजार सुरू आहेत की नाही याबाबतही विचारणा केली जात आहे.

अनलॉक सुरू झाल्यामुळे हॉटेल बुकींगमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली असून ही बुकींग जून महिन्यासाठी आहे. पण, ज्या राज्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल झाले त्याचठिकाणी ही परिस्थिती असल्याचे मेक माय ट्रीपच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक स्थळांना भेट देण्यासाठी देखील पर्यटक विचारणा करत आहेत. यामध्ये लोणावळा, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, मनाली, जयपूर हे ठिकाणांना सर्वाधिक पसंती देत आहेत, असे booking.com च्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच पर्यटक हे कमी दिवसांच्या पर्यटनाबद्दल देखील विचारणा करत असून रिसोर्ट, व्हिला आदी ठिकाणांना पसंती दिली जात आहे.