Madhya Pradesh Tourism
sakal
टूरिझम
Madhya Pradesh Tourism: कमी बजेट मध्ये नववर्षाचे पर्यटन! मध्य प्रदेशातील हे ३ ऑफबीट स्पॉट्स का आहेत ट्रेंडमध्ये?
Why Madhya Pradesh Is Trending for Budget New Year Travel: कमी बजेटमध्ये नववर्ष साजरे करण्यासाठी मध्य प्रदेशातील शहडोल, उमरिया आणि अनुपपूर हे ऑफबीट पर्यटनस्थळ पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. निसर्ग, वन्यजीव आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव एका सहलीत मिळत असल्याने ही ठिकाणे ट्रेंडमध्ये आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही कमी बजेटमध्ये पण रोमांचक सहलीचा विचार करत असाल, तर मध्य प्रदेशातील (MP) तीन जिल्ह्यांनी सध्या पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे. शहडोल, अनुपपूर आणि उमरिया या पट्ट्यात निसर्ग, वन्यजीव आणि आध्यात्मिक शांतीचा असा अनोखा संगम पाहायला मिळतोय, ज्याची मागणी यंदा विक्रमी ठरली आहे.

