Christmas Celebration : बर्फवृष्टीशिवाय ख्रिसमसला मजा नाही; या ठिकाणीच साजरा करायला हवा ख्रिसमस ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas Celebration

Christmas Celebration : बर्फवृष्टीशिवाय ख्रिसमसला मजा नाही; या ठिकाणीच साजरा करायला हवा ख्रिसमस !

डिसेंबर महिना सुरू आहे, म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. अनेक पर्यटकांना नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी एखाद्या हिल स्टेशनवर जायचे असते. वर्षाचा शेवट निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी सगळेचजण उत्सुक असतात. त्यामूळे वर्षाच्या शेवटी अनेक पर्यटनस्थळे हाऊसफूल असतात.

लहानपणापासून ख्रिसमस म्हटले की, बर्फाच्छादित डोंगरावर ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज त्याच्यासोबत गिफ्ट असेच चित्र डोळ्यासमोर येते. भारतात जरी कमी ठिकाणी बर्फ पडत असला तरी देखील आपल्याला बर्फाचे फारच आकर्षण असते. त्यामूळे यंदाच्या ख्रिसमसला तूम्हालाही बर्फाच्छादीत डोंगरात साजरा करायचा असेल तर हे खास ठिकाण नक्की पहा.

हेही वाचा: Rishabh Pant Trolled: 'ऋषभ तू मुर्ख...' त्या जाहिरातीवरून प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतींनी टोचले कान

कासोल हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यात वसलेले एक गाव आहे. ते पार्वती खोऱ्यात, नदीच्या काठावर आहे. कसोल हे बॅकपॅकर्ससाठी हिमालयातील हॉटस्पॉट आहे. येथे इस्रायली पर्यटकांची संख्या जास्त असल्याने याला भारताचा मिनी इस्रायल असेही म्हटले जाते.

हेही वाचा: Christmas Destinations : ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यातल्या या डेस्टीनेशन्सना नक्की भेट द्या!

भारतात हिमाचलच्या पर्वतरागांमध्ये बर्फवृष्टी होते. तिथेच असलेल्या कसोलमध्ये हिवाळ्यात खास वातावरण असते. या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा मित्रांसोबत नवीन वर्षात धमाल करू शकता. कसोल हे जोडप्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जिथे तुम्ही बर्फवर्षावाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

हेही वाचा: IRCTC Package : झुक-झुक गाडी नववर्षात घडवणार परदेशवारी; प्रवाशांसाठी IRCTC चं न्यू इअर गिफ्ट

येथे पोहोचल्यानंतर खीरगंगा, मलाणा गावाला भेट द्या आणि ट्रेकिंगचा आनंद घ्या. कासोलमध्ये वर्षभर आल्हाददायक हवामान असते. आणि डिसेंबरच्या अखेरीस ते फेब्रुवारीपर्यंत लक्षणीय हिमवृष्टी होते.

केवळ 5 हजार खर्च

एका दिवसाचे हॉटेलचे भाडे सुमारे 500 - 1500 रुपये असेल. जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. जर तुम्ही दोन दिवसांचा प्रवास केला असेल तर हॉटेलचा खर्च सुमारे 2000 रुपये. जेवणाचा खर्च 500-1000 रुपये आणि बसचे भाडे 1500-2000 रुपये आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सुमारे 5000 रुपयांमध्ये कसोलला भेट देऊ शकता आणि हे नवीन वर्ष तुम्ही संपूर्ण वर्ष चांगल्या आठवणींमध्ये घालवू शकता.

हेही वाचा: जगभर फिरण्यासाठी भारतीय दैनंदिन खर्चांना कात्री लावण्यास तयार; रिसर्चमधून झाला खुलासा

फोटोग्राफीसाठी कासोलला दुसरा पर्याय नाही

फोटोग्राफीसाठी कसोल सर्वोत्तम आहे कासोलच्या सुंदर मैदानात गेल्यावर फोटोग्राफी केल्याशिवाय परत येणं शक्य नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही कसोलला जाण्याचा विचार करत असाल तर चांगला कॅमेरा असलेला कॅमेरा किंवा मोबाईल ठेवायला विसरू नका. जवळच मणिकरण आहे, जिथे तुम्हाला गरम पाण्याचा झरा देखील मिळेल.

कसे पोहोचाल

कासोलला जाण्यासाठी तुम्ही दिल्लीहून बस घेऊ शकता.  जी तुम्हाला केवळ 12 तासांत कासोलला पोहोचवेल. बसचे भाडे तुम्हाला सुमारे 800 रुपये इतके लागेल. कसोलमध्ये कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. जवळचे रेल्वे स्टेशन 124 किमी अंतरावर आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही कुल्लूला विमानाने जाऊ शकता. कसोल येथून ४५ किमी आहे. जिथे तुम्ही टॅक्सीने पोहोचू शकता.