Christmas Destinations : ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यातल्या या डेस्टीनेशन्सना नक्की भेट द्या!

ख्रिसमसला नाईट क्लब, डान्स क्लब, क्रूझ येथील सेलिब्रेशनला वेगळीच चमक आलेली असते
Christmas Destinations : ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यातल्या या डेस्टीनेशन्सना नक्की भेट द्या!

थंडीची चाहुल लागते आणि ख्रिसमसचे सेलिब्रेशन प्लॅन सुरू होतात. कारण, दिवाळीनंतर मोठी सुट्टी मिळणारा सण म्हणजे ख्रिसमस. या सुट्टीत लोक ख्रिसमस बाहेर साजरा करण्यासाठी जातात. तूम्हालाही ख्रिसमसचे सेलिब्रेशन करायचे असेल तर गोव्यापेक्षा चांगला पर्याय नाही.

गोव्यात असणाऱ्या चर्चमूळे ख्रिसमसच्या दिवशी येथे एक वेगळीच धुम असते. ख्रिसमसपासून ते नववर्षाच्या सेलिब्रेशनपर्यंत गोवा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. गोव्यात ख्रिसमस पार्टीला उपस्थित राहून तुम्ही तुमचा आनंद द्विगुणीत करू शकता.

अरंबोल बीच

तुम्हाला गोव्यातील बीच पार्टीचा आनंद घ्यायचा असेल तर कॅंडोलिमच्या रोडवर असलेल्या अरम्बोल बीचवर पोहोचा. येथे पार्ट्यांव्यतिरिक्त रात्री फटाक्यांची आतिशबाजी असते. फटाक्यांचा शो पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक या बीचवर गर्दी करतात.

बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च

गोव्यात सुंदर आणि ऐतिहासिक असंख्य चर्च असले तरी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चला भेट द्या. तुम्हाला ख्रिसमस पार्टी स्पेशल करायची असेल तर याहून भन्नाट पर्याय नाही. हे ठिकाण ओल्ड गोवा पासून जवळ बेंग्युनिम येथे आहे. जिथे ख्रिसमसची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते. याठिकाणी विविध शहरांतील लोक भेट देतात.

अगुआडा किल्ला

अगुआडा किल्ला हा गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे जेथे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लक्षणीय संख्येने पर्यटक भेट देतात. येथील रोषणाई आणि ख्रिसमस संध्याकाळचा कार्यक्रम अतिशय चांगला असून रात्री उशिरापर्यंत आयोजित केला जातो.

या ठिकाणीही पार्टीचा आनंद घ्या

या खास ठिकाणांव्यतिरिक्त, तुम्ही बागा बीच, सॅटरडे नाईट मार्केट, कलंगुट बीच, वागेटोर बीच यांसारख्या ठिकाणी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्येही सहभागी होऊ शकता. ख्रिसमसला नाईट क्लब, डान्स क्लब, क्रूझ येथील सेलिब्रेशनला वेगळीच चमक आलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com