उन्हाच्या झळा, थंड हवेच्या ठिकाणी करा लग्न सोहळा

महाराष्ट्रासह देशातही अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करु शकता.
hill stations
hill stationsgoogle

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. मात्र जर का या गरमीतही तुम्हाला तुमचे लग्न अविस्मरणीय बनवायचे असल्यास आणि डेस्टिनेशन वेडिंग करायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह देशातही अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करु शकता. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात लग्नाचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांना उष्ण हवामानाचा लग्नाच्या ठिकाणावर परिणाम होईल अशी काळजी वाटत असते. पण आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही. कारण आज आम्ही तुमच्यासाठी डोंगराळ भागातील काही खास आणि थंड हवेची ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही थंड वाऱ्याचा आनंद लुटत आनंदाने लग्नाचे सात फेरे घेऊ शकता.

ऋषिकेश, उत्तराखंड

एका नव्या आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही हिमालयाच्या दृश्यासह गंगा नदीवर लग्नाआधीचे शूट करू शकता. याशिवाय येथील शांत वातावरण जोडप्यांना पूर्णपणे रोमँटिक बनवते. अशा सौंदर्याच्या सानिध्यात तुम्ही तुमचे लग्न डेस्टिनेशन वेडिंग म्हणून करु शकता. त्यासोबत हनिमूनही प्लॅन करू शकता.

शिमला, हिमाचल प्रदेश

देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या हिल स्टेशन्सपैकी एक म्हणजे शिमला. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे मानले जाते. येथे असलेली विविध सुंदर ठिकाणं प्रत्येकाचे मनाला भुरळ घालतात. येथील रोमॅंटीक वातावरण प्रत्येक जोडप्याला एकमेकांच्या प्रेमात पाडते, असे म्हटंले जाते.

काश्मीर

पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये लग्न करण्याचं स्वप्न पाहणं हे कोणालाही आवडणार आहे. इथल्या डोंगराळ आणि हिरव्यागार ठिकाणांत लग्नरुपाने आयुष्याची गाठ बांधणे प्रत्येकासाठी रोमँटिक ठरु शकते. श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाममध्ये राहून तुम्ही तुमच्या यादीत सुंदर हॉटेल्स जोडू शकता, जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करु शकता.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील एक महत्वाचे थंड हेवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरकडे पाहिले जाते. कडक उन्हापासून दूर, महाबळेश्वर हे मुंबई आणि पुण्यातील बहुतेक लोकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक सुंदर हिल स्टेशन्स आहेत. परंतु तिथल्या सुंदर दृश्यांमुळे ते लग्नाचं एक उत्तम ठिकाण बनलं आहे. त्यामुळे या भागात अनेक जोडप्यांना डिस्टिनेशन वेडिंग करायची इच्छा असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com