
Diwali 2025 Train Travel Tips
Sakal
भारतीय रेल्वेने दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा वस्तू बॅगमध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे अपघात टाळता येतील आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल.
Diwali 2025 train travel packing tips: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे भारतीय रेल्वेने (IR) प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी, राष्ट्रीय वाहतूकदाराने अलीकडेच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाचे बांधकाम पूर्ण केले आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वांद्रे टर्मिनस, उधना आणि सुरतसह इतर प्रमुख स्थानकांवरही अशाच प्रकारची होल्डिंग एरिया विकसित करण्यात आली आहेत .