
Uttar Pradesh government’s new tourism project to offer Nainital-like scenic beauty and hill experience at affordable rates.
Sakal
उत्तराखंडमधील नैनीतालची निसर्गरम्य सुंदरता अनुभवण्याची तुमची इच्छा असेल, तर आता तुम्हाला खूप खर्च करण्याची गरज नाही! लवकरच उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात एक असे पर्यटनस्थळ विकसित केले जात आहे, जे तुम्हाला अगदी नैनीतालसारखा अनुभव देईल.
सोनभद्र जिल्ह्यातील बेलहत्थी गावात ओबरा धरणाच्या (Obra Dam) किनाऱ्यावर असलेल्या आमी नाल्याला पर्यटन विभाग नैनीतालच्या धर्तीवर विकसित करण्याची योजना आखत आहे. येथे पर्यटक बोटीतून फिरण्याचा आनंद घेऊ शकतील आणि निसर्गाच्या कुशीत बसून मनमोहक दृश्यांचा आस्वाद घेऊ शकतील. विशेष म्हणजे, यासाठी खर्च खूप कमी येणार आहे.