
मदुराई हे भारतातील तामिळनाडू राज्यातील एक सुंदर शहर आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन वस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. हे शहर प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. निसर्गाने नटलेले हे शहर वैगई नदीच्या काठावर वसलेले आहे. 2500 वर्षे जुने असलेले मदुराई तामिळनाडू राज्याचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र आहे.
मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिर हे हिंदू मंदिर प्रसिद्ध आहे. इथे उंच गोपुरम आणि दुर्मिळ शिल्पे भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. या कारणास्तव याला मंदिरांचे शहर असेही म्हणतात. तसेच हे प्राचिन चर्चचेही शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक चर्च आहेत. नाताळ साजरा करण्यासाठी जसे लोक गोव्याला पसंती देतात. तसे अनेक लोक दरवर्षी मदुराईलाही भेट देतात.