Tourism News : केरळमधील निसर्गाच्या कुशीत वसलेली पर्यटन स्थळ पाहिलाय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism News about keral

Tourism News : केरळमधील निसर्गाच्या कुशीत वसलेली पर्यटन स्थळ पाहिलाय?

पावसाळ्याचे वातावरण आता हळुहळू कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पर्यटन आणि फिरण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत. डिसेंबर महिना हा पर्यटनासाठी तसा खास महिना मानला जातो. कारण या महिन्यातील गुलाबी थंडीचे वातावरण अनेकांना फिरण्यासाठी परफेक्ट वाटते. त्यामुळे कित्येकजण या महिन्यात पर्यटनाचा प्लॅन करतात.

या महिन्यात पर्यटन किंवा फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे दक्षिणेतील काही राज्य होय. त्यामुळे पर्यटन डिसेंबरमध्ये केरळ पर्यटनला भेट देण्याचा घाट घालतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की केरळला भेट देत असताना तुम्ही अनेक ग्रामीण बाज असणाऱ्या काही गांवाना आणि शहरांना भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला केरळालातील अशी काही ठिकाणे सांगणार आहोत जी निसर्गाच्या कुशीत वसली आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही केरळला भेट द्याल तेव्हा या ठिकाणांना नक्की भेट द्या.

हेही वाचा: Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

अलप्पुझा

पूर्वेचे व्हेनिसे म्हणून अलप्पुझा शहराला ओळखले जाते. नौका शर्यत, बॅकवॉटर समुद्रकिनारे, सागरी उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत.

सुंदर समुद्रकिनारे

अलप्पुझामधील अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. हे समुद्रकिनारे लोकप्रिय असल्याने अनेक पर्यटन याठिकाणांना भेट देतात. विजया बीच पार्कमधील मनोरंजनाच्या सुविधा समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणात भर घालतात.

जुने खांब आणि लाईटहाऊस

इथल्या समुद्रातील एका खांब हा १३७ वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. हे एक जुने लाईट हाऊस आहे. असे अनेक लाईटहाऊस तुम्हाला या परिसरात पहायला मिळतील. अनेकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून लोक यालाही भेट देतात.

हेही वाचा: Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?

मुन्नार

मुथिरपुझा, नल्लथन्न आणि कुंडल या तीन पर्वत रांगांच्या संगमावर वसलेले हे एक सुंदर शहर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या शहराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे हजेरी लावतात. पर्यटकांना आकर्षित करणारे निसर्गसौंदर्य असल्याने हे केरळमधील एक बेस्ट ठिकाण मानले जाते.

इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान

येथील इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान हे लुप्त होत चाललेला प्राणी नीलगिरी थारसाठी ओळखला जातो. ९७ किमी अंतरापर्यंत हे उद्यान पसरलेले आहे. त्यामुळे या परिसरात अनेक पर्यटन प्रेमी भेट देतात. अनेकांना या ठिकाणी जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असतो.

Web Title: Famous Tourist Places In Kerala With Nature Touch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..