Ganapatipule : गणपतीपुळेला उन्हाळी सुटी एन्जाॅय करण्यासाठी जाताय? मग, आधी ही बातमी वाचा..

मेच्या पहिल्या आठवड्यानंतर गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे.
Ganpatipule summer vacation
Ganpatipule summer vacation esakal
Summary

शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्ट्यांमुळे १५ हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळेत येतात.

रत्नागिरी : ऐन हंगामात सुरू असलेल्या कामांमुळे गणपतीपुळे (Ganapatipule) येथे पर्यटकांना दिवसातून एकदा तरी वाहतूक (Traffic) कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पर्यटन आराखड्यात मंजूर झालेली कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

सध्या पाणी योजना आणि गटारे यांची कामे सुरू आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्‍यातील पर्यटक गणपतीपुळे येथे दररोज येत असल्याने प्रचंड गर्दी आहे. चारचाकी, खासगी बस या मार्गावर गुरुवारी (ता. १८) दुपारी ही कोंडी झाली.

मेच्या पहिल्या आठवड्यानंतर गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागात पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे. शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्ट्यांमुळे १५ हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळेत येतात. सोमवारी थोडी गर्दी कमी झाली असली तरीही दररोज १२ हजारांहून अधिक पर्यटक (Tourists) गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन जात आहेत. बहुसंख्य पर्यटक खासगी बस, चारचाकी गाड्यांद्वारे फिरायला बाहेर पडतात.

Ganpatipule summer vacation
Siddaramaiah : मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा होताच सिद्धरामय्या म्हणाले, मला गुरे पाळण्यास..

गणपतीपुळे येथे सध्या विकासकामे वेगाने सुरू आहेत. गुरुवारी (ता. १८) गटार दुरुस्तीच्या कामामुळे वाहने सागरदर्शन येथे पार्क केली जात होती. मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तिकीट नाक्याजवळ वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. स्थानिक पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पर्यटकांनी निःश्‍वास सोडला. येथे सुरू असलेले काम पूर्ण झाल्यावर मंदिराकडे जाणारी वाहने सोडली जाणार आहेत. वाहतूक कोंडी होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ganpatipule summer vacation
Eknath Shinde : 'जुन्या पेन्शनबाबत शासन सकारात्मक, अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ'

दरम्यान, गणपतीपुळे येथे सुरू असलेली कामे उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी करावीत, अशी मागणी स्थानिकांनी फेब्रुवारीत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली होती. त्यानंतर ही कामे वेगाने पूर्ण केली असती तर आता रस्ते मोकळे राहिले असते. अरुंद रस्ते असल्याने यामधून दोन मोठ्या गाड्या नेताना कसरत करावी लागते. सध्या गणपतीपुळेमध्ये सांगली, कोल्हापूरसह सातारा येथील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा त्यात वाढ होईल, असे व्यावसायिकांचे मत आहे.

Ganpatipule summer vacation
Atpadi Election : भाजप, राष्ट्रवादीला मोठा धक्का; शेवटच्या क्षणी शिवसेनेनं फिरवली बाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com