Goa Tourism | गोव्यात फिरताना या गोष्टी करू नका; नाहीतर महागात पडेल ट्रिप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Goa Tourism

Goa Tourism : गोव्यात फिरताना या गोष्टी करू नका; नाहीतर महागात पडेल ट्रिप!

मुंबई : नविन लग्न झालेली जोडपी, तरूण-तरूणी अहो एवढेच काय तर वयस्कर मंडळीही गोव्याला जायला एका पायावर तयार असतात. काहींना गोव्यातील जेवण आवडतं तर काहींना तिथले समुद्र किनारे. त्यामुळे सुट्टी मिळताच सर्वत्र गोव्याला जायचा प्लॅन करतात.

कंटाळलेल्या लोकांना रिफ्रेश करण्यासाठी गोव्याचे बीच हे एनर्जी प्लेस आहेत. येथे तुम्हाला निसर्ग, पार्टी, खाद्यपदार्थ आणि वॉटर स्पोर्ट्स अनुभवायला मिळतील. गोव्यात मजा करण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत आहे पण गोव्यात येताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुमची गोवा ट्रिप वाईट ठरणार नाही.

गोवा आपल्याच देशातील आपल्या शेजारील राज्य असले तरी तिथले नियम वेगळे आहेत. कमी खर्चात अधिक एन्जॉय म्हणून सर्वात जास्त विदेशी पर्यटक गोव्यात येतात.त्यामुळे अशा पर्यटकांसाठी काही खास नियम गोवा पर्यटन विभागाने बनवले आहेत.

गोव्यात ठरवून दिलेल्या झोनमध्येच वॉटर स्पोर्ट्स आणि बोटींग करण्याची परवानगी आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या ठिकाणांवर बोटींग केल्यावर कारवाई होऊ शकते.

क्रूझवर जाण्यासाठी लागणारी तिकीटे ब्लॅकनेही विकली जातात. त्यामूळे तूम्हाला सेफ क्रूझ राईड करायची असेल तर क्रूझ काउंटरवरूनच तिकीटे खरेदी करा.

गोव्यात 1 जुलै 2022 पासून प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. खाद्यपदार्थ तिथे खाणार असाल तर त्यांच्या प्लास्टिकच्या अथवा कागदाच्या पिशव्या अथवा चॉकलेट रॅपर्स, उरलेले अन्नपदार्थ शीतपेये अथवा बियरचे कॅन इत्यादी कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी डब्यात टाका, इतरत्र टाकू नका.

काही पर्यटकांना समूद्र किनाऱ्यावर जेवण स्वत: बनवून खायचे असते. पण, तिथे जाऊन असे करू नका. गोव्यात बीचवर नाही तर रस्त्याकडेला गाडी उभी करून तिथे जेवण बनवूया असे खूळ डोक्यात आले असेल तर ते आधी काढून टाका. कारण त्यामुळे तूमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

गोव्यात जायच आणि किनाऱ्यावर डेस्कबेड टाकून झोपायचा प्लॅन असेल तर सावध व्हा. राज्य सरकारच्या परवानगी शिवाय तूम्ही हे सुख घेऊ शकत नाही. असे केल्यामुळे नियम मोडल्याचा आरोप तूमच्यावर होईल.

गाडी गोव्यात फिरूदेत किंवा जगात कुठेही तिचे नियम सारखेच आहेत. गोव्याचा विचार करता तिथे गाडी घेऊन जाताना गाडीची कागदपत्रे आणि ड्रायव्हरचे लायसन्स या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

टॅग्स :TravelTourisim