Guwahati Places : कामाख्या मंदिर सोडून गुवाहाटीमध्ये बघण्यासारखं काय काय आहे ?

आसामच्या राजधानीचं शहर म्हणजे गुवाहाटी. ब्रम्हपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराकडे पर्यटक आकर्षित होत असतात.
Guwahati Places
Guwahati PlacesEsakal
Updated on

आसामच्या राजधानीचं शहर म्हणजे गुवाहाटी. ब्रम्हपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराकडे पर्यटक आकर्षित होत असतात. घाटातून होणारी बसवाहतूक, रमणीय हिरवागार डोंगराळ परिसर, शेती व बागायती परिसर यामुळे हिवाळ्यात जाण्यासाठी हा एक वेगळा पर्याय तुमच्यासमोर असेलभारताच्या ईशान्येकडील अति रमणीय, नैसर्गिकदृष्ट्या नटलेला आसाम पर्यटकांसाठी चांगलं आकर्षण आहे. 

आजच्या लेखात आपण गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिर सोडून गुवाहाटीमध्ये बघण्यासारखे कोण कोणते ठिकाणे आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आसाम म्हणजे म्यानमार, तिबेट (चीन) भूतान, पू. बंगाल (बांगलादेश) ह्या आंतरराष्ट्रीय सीमांना भिडलेला भाग आहे. गुवाहाटी हे आसाममधलं महत्त्वाचं शहर होय. बाजूनं जाणारी ब्रह्मपुत्रा नदी, घाटातून चालणारी बसवाहतूक, रमणीय हिरवागार डोंगराळ परिसर, शेती व बागायती परिसर पर्यटकांना आकर्षित करीत असतो.पूर्ण आसामात रेल्वेचं कमी असून, बससेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. ह्या भागांतून तिस्ता, हुगळी, गंगा, ब्रह्मपुत्रा ह्या नद्या जातात. साहजिकच हा परिसर शेतीनं संपन्न आहे. इंडस्ट्री म्हणावी तशी नसल्यानं शांत, प्रदूषणमुक्त परिसरातून प्रवास होतो. गुवाहाटीजवळ एक मोठा प्रसिद्ध तलावही आहे, जिथे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

गुवाहाटी’ रेल्वेस्थानक प्रशस्त असून आसपास पर्यटकांसाठी भरपूर हॉटेल्स आहेत. तेथून जवळच म्हणजे सुमारे तीन किमीवर लांब व रुंद पात्र असलेली ‘ब्रह्मपुत्रा’ दिसते. छोट्या बोटीने नदी काठ पार करावा लागतो. बोटीतून ब्रह्मपुत्रा पार करणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. ब्रह्मपुत्रा जिथे उगम पावते तेथे बेट असून काही (50 ते 60) पायऱ्या वर चालल्यावर उमानंद महादेव शिवमंदिर आहे. पुढे नवग्रह, वशिष्ठ मंदिर 20 किमीवर असून त्याची बांधणी दगडी आहे. गुवाहाटी रेल्वेस्टेशनहून सुमारे (NH. 39) 30 किमीवर सफेद मार्बलचं बालाजी मंदिर आहे. ‘कलाक्षेत्र’ या सांस्कृतिक संग्रहालयात आसामची सांस्कृतिक झलक पाहायला मिळते.

● हाजो

गुवाहाटीपासून 60 किमी ‘हाजो’ इथे विष्णू महादेव मंदिर असून ते चढावावर आहे. तलावात पाय धुवूनच पुढे 70 ते 80 पायऱ्या चढून वर जावं लागतं. मंदिर पूर्ण दगडी असून आत कृष्णाच्या पाच वेगवेगळ्या मूर्ती आहेत. ह्याला मंदिराला आसामचं खजुराहो म्हणतात.

Guwahati Places
Winter Recipe: वर्षेभर टिकणारा आवळ्याचा मोरावळा कसा तयार करायचा?

● सौलकुची

गुवाहाटीपासून जेमतेम 40 किमीवर ‘सौलकुची’ नावाचं महिला पर्यटकांना आकर्षित करणारं ठिकाण आहे. ‘मोगा सिल्क’ उत्पादनासाठी तो प्रसिद्ध आहे. मेखला व साडी हे रेशमाचे दोन प्रकार तेथे मिळतात. ‘मोगा’ नावाचा रेशमी किडा तेथे विकसित केला जातो. त्यापासून रेशीम काढले जाते.

● आसाम राज्य संग्रहालय

गुवाहाटीजवळील आणखी एक प्रसिद्ध आकर्षण म्हणजे आसामचे राज्य संग्रहालय जे तुम्हाला इतिहासाच्या वाटेवर नेईल. तुम्ही या संग्रहालयाला भेट देऊ शकता आणि ईशान्येकडील राज्यांच्या समृद्ध संस्कृती आणि प्राचीन इतिहासाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. हे पाचव्या शतकातील, दुसरे महायुद्ध आणि भारत ब्रिटिश वसाहत असतानाच्या काळातील हस्तनिर्मित प्राचीन वस्तू आणि शिल्पे प्रदर्शित करते.

Guwahati Places
Vinayak Chaturthi 2022: कधी आहे मार्गशीर्ष विनायक चतुर्थी? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

● उमानंद बेट

हे बेट पाहण्यासाठी एक सुंदर राजवाडा आहे कारण या सुंदर नदीच्या बेटावर भगवान शिवाने भगवान कामदेवाला जाळून राख केल्याचे सांगितले जाते. बेटावर प्रसिद्ध भगवान शिव मंदिर आहे. या बेटाचा आकार मोरासारखा असल्यामुळे ब्रिटीशांनी या बेटाला पूर्वी पीकॉक आयलंड म्हणून ओळखले होते.

● सिल्पुखुरी 

सारानिया हिल्सचा एक भाग, सिल्पुखुरी हे प्रसिद्ध ब्रह्मपुत्रा नदीच्या जवळ वसलेले आहे. जवळपास असलेल्या विविध सॉफ्टवेअर व्यवसायांमुळे हे एक इष्ट निवासी क्षेत्र बनले आहे. कनवाचल रोड, हाऊसिंग रोड आणि नवग्रह रोडमुळे धन्यवाद, सिल्पुखुरी शहराच्या इतर भागांशी आश्चर्यकारकपणे जोडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com