सुट्टीत 'या' 8 सुंदर हिल स्टेशनला भेट द्या: फक्त 5000 रुपयात : Winter Tourism | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषिकेश

सुट्टीत 'या' 8 सुंदर हिल स्टेशनला भेट द्या: फक्त 5000 रुपयात

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

हिवाळ्यात हिल स्टेशनवर जाण्याची एक वेगळीच मजा असते. तुम्हीही अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर अगदी कमी पैशात म्हणजे ५००० रूपयात तुम्ही सहज ट्रिप करू शकता. जेवण व राहण्याची उत्तम सोय शिवाय तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया..

रानीखेत, उत्तराखंड: उत्तराखंडच्या कुमाऊं भागातील हे एक सुंदर ठिकाण आहे. दिल्लीपासून राणीखेत ३६५ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी तुम्ही ३ ते ४ दिवसाचे प्लॅनिंग करू शकता. चौबटिया गार्डन, माजखली आणि झुलादेवी मंदिर अशी प्रसिध्द ठिकाणे आहेत. कॅम्पिंगसोबतच खेळाचाही आनंद घेऊ शकता.

मसुरी : मसुरी ट्रेकिंग आणि वॉटर फॉलसाठी प्रसिध्द आहे. मसुरीमध्ये तुम्हाला ६०० रुपयांमध्ये आरामात राहण्यासाठी हॉटेल मिळेल. मसुरीत केम्प्टी फॉल, गन हिल पॉइंट, मॉल रोड, धनौल्टी आणि कनाटल या ठिकाणांना भेट देता येते.

ऋषिकेश: हे ठिकाण अॅडव्हेंचरसाठी बेस्ट आहे. दिल्लीपासून 229 किमी अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ट्रेनचा वापर करू शकता. २०० पासून १४०० पर्यत दराची तिकिट उपलब्ध आहे. याठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला धार्मिक निवासस्थाने १५० रूपयांमध्ये उपलब्ध आहेत.

कसौली: वीकेंडमध्ये एखाद्या सुंदर हिल स्टेशनचा जाण्याचा विचार करत असाल तर कसौली हा बेस्ट पर्याय आहे. कसौलीला जाण्यासाठी दिल्ली ते कालका ट्रेनने जाऊ शकता. कालका येथे पोहोचल्यानंतर, येथून कसालीला टॅक्सी घेऊ शकता. येथे राहण्यासाठी अनेक स्वस्त हॉटेल्स आहेत जी 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. तुमच्या संपूर्ण ट्रिपसाठी 5000 रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही.

लॅन्सडाउन: लॅन्सडाउन हे एक लहान पण अतिशय शांत आणि सुंदर हिल स्टेशन आहे. हे दिल्लीपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी कोटद्वारला बसने जाऊ शकता. दिल्ली ते कोटद्वारापर्यंत ट्रेनने जाऊ शकता. येथून लॅसडाऊन(Lansdowne)५० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही कोटद्वारहून बसने लॅन्सडाउनला सहज पोहोचू शकता. तुम्हाला येथे राहण्यासाठी 1500 रुपयांपर्यंत एक उत्तम खोली मिळेल.

वृंदावन: जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर एकदा वृंदावनला नक्की भेट द्या. वृंदावनात मंदिरासह बऱ्याच ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला इतिहासात रस असेल तर तुम्हाला येथे अनेक आकर्षक ठिकाणे पाहायला मिळतील. येथे हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे 600 रुपये किंवा त्याहून कमी आहे.

बिनसार: वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण दिल्लीपासून 9 तासांच्या अंतरावर आहे. येथे तुम्हाला बिबट्या, हरीण तसेच अनेक प्रकारचे सुंदर पक्षी पाहायला मिळतील. येथे जाण्यासाठी तुम्ही दिल्लीहून काठगोदामला जाण्यासाठी ट्रेनने जाऊ शकता. याठिकाणी जाण्यासाठी एकूण खर्च सुमारे 2000 रुपये येईल. जेवण आणि राहण्याचाही जास्त खर्च लागणार नाही.

कसोल: कसोल हे ट्रेकिंग ट्रेल्स आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. येथील बार आणि रेस्टॉरंट्स तुम्हाला गोव्याची आठवण करून देतील. हे ठिकाण दिल्लीपासून थोडं लांब आहे. येथे येण्यासाठी तुम्ही रात्रीची बस घेऊ शकता, ज्याचे भाडे रु.800 पेक्षा कमी आहे. कसोलमध्येही तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत हॉटेल्स मिळतील.

loading image
go to top