esakal | हनीमून सेलिब्रेशनसाठी भारतातील परफेक्ट डेस्टिनेशन; एकवेळ जरूर भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

हनीमून सेलिब्रेशनसाठी भारतातील परफेक्ट डेस्टिनेशन; एकवेळ भेट द्या

हनीमून सेलिब्रेशनसाठी भारतातील परफेक्ट डेस्टिनेशन; एकवेळ भेट द्या

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोरोना काळानंतर लग्नाच्या पध्दतीत अनेक बदल झाले आहेत. अगदी मोजक्या लोकांसमवेत हा समारंभ पार पाडावा लागतो. कोरोनामुळे आलेले नियम, अटी, बंधने याने लग्न शाही थाटात करायचे या स्वप्नांचा अनेकांच्या चुराडा झाला आहे. आता हळूहळू या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येत अनेकजन हनीमूनचे प्लॅनिंगसाठी लागले आहेत. मात्र कोणत्या डेस्टिनेशनला जायचे याबद्दल कायम संभ्रम असतो. हनीमूनच्या आठवणी बेस्ट करण्यासाठी भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

कश्मीर

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. काश्मीर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला हनीमूनच्या आठवणी बेस्ट बनवायच्या असतील तर नक्कीच काश्मीरला जा. काश्मीरमध्ये अनेक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी एक म्हणजे डाळ तलाव. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता तसेच काही क्षण निसर्गासोबत घालवू शकता.

अलेप्पी, केरळ

केरळ प्री वेडिंग शूट, रोमँटिक सुट्ट्या, लग्नाची ठिकाणे, हनीमून आणि बेबीमूनसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने कपल्स केरळला भेट देतात. केरळ आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. दक्षिण भारतातील या राज्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी एक अलेप्पी आहे. कपल्ससाठी हे खूप लोकप्रिय ठिकाण आहे. अलेप्पीला भेट देऊन तुम्ही तुमचा हनिमून संस्मरणीय बनवू शकता.

ऊटी, तामिळनाडू

तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात ऊटी हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मोठ्या संख्येने पर्यटक आणि कपल्स सुट्टीसाठी ऊटीला जातात. यासाठी तुम्ही हनीमूनसाठी ऊटीलाही जाऊ शकता. पर्यटनामध्ये इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. लोक निलगिरी धबधबा, माकड धबधबा आणि होजेनक्कल धबधब्यांना विशेषतः पावसाळ्यात भेट देतात.

अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबार हनीमूनसाठी योग्य ठिकाण मानले जाते. अंदमानमध्ये सूर्यास्ताची वेळ सर्वात महत्त्वाची असते. यावेळी मोठ्या संख्येने लोक फोटो शूटसाठी समुद्रकिनाऱ्यावर थांबतात. याशिवाय तुम्ही समुद्रकिनारी बोटिंग, सर्फिंग, फिशिंग, स्कीइंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता. कोणत्याही हंगामात या ठिकाणी भेट देता येते.

loading image
go to top