
News : मॅरियट इंटरनॅशनल इन्क. (नॅसडॅक: एमएआर)ने आज मध्यम व उच्च दर्जाच्या निवास विभागांसाठी नवीन कलेक्शन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट™'च्या जागतिक लाँचची घोषणा केली. जेथे कंपनीने जगभरात आपल्या निवास ऑफरिंग्जमध्ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. सिरीज बाय मॅरियट उत्तमरित्या स्थापित प्रादेशिक निर्मित ब्रँड्स व हॉटेल्सना सादर करत मॅरियटची जागतिक उपस्थिती विस्तारित करण्याची अपेक्षा आहे. जे मॅरियट बोनव्हॉय पोर्टफोलिओमध्ये सतत दर्जा व सेवेची भर करतात. सिरीज बाय मॅरियट अतिथींना अधिकाधिक ठिकाणी आरामदायी निवास देईल, तसेच प्रादेशिक मालकांना मॅरियटच्या प्लॅटफॉर्म्सचे फायदे, कंपनीचा पुरस्कार-प्राप्त मॅरियट बोनव्हॉय लॉयल्टी प्रोग्राम उपलब्ध करून देईल. या सुविधा देताना कंपनीच्या पोर्टफोलिओची स्वतंत्र ओळख कायम राखली जाईल.