Kerala Tourisam: दिवाळीच्या सुट्टीत केरळचा प्लॅन करताय?; इथे आहेत बेस्ट प्लेस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kerala Tourisam

Kerala Tourisam: दिवाळीच्या सुट्टीत केरळचा प्लॅन करताय?; इथे आहेत बेस्ट प्लेस!

निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकंती करणं, ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना भेटी देणं, घनदाट जंगलात किंवा समुद्रकिनारी मुशाफिरी करणं प्रत्येकाला आवडतं. देशात पर्यटनासाठी  अनेक सुंदर स्थळं आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. महाराष्ट्राच्या बाजूला असलेल्या गोव्यात पर्यटक गर्दी करतात. 

हेही वाचा: kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?

भारताच्या नैऋत्य टोकावरील देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले केरळ टुरीस्टचे आवडते शहर आहे. समतोल हवामान, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, मलमोहक बॅकवॉटर, हिरवीगार हिल स्टेशन्स, आयुर्वेदिक उपचार केंद्रे आणि वन्यजीव यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. आज केरळमधील काही प्रसिद्ध ठिकाणे पाहुयात.

हेही वाचा: Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

● केरळची हत्ती सवारी

केरळमध्ये जाऊन हत्तीची सवारी केली नाही हे तर चुकीचे आहे. केरळमध्ये मुन्नार आणि थेक्कडीमध्ये तूम्ही हत्तीसोबत खेळू शकता. त्यांना अंघोळ घालू शकता. तसेच हत्ती सफारी करू शकता. 

● अलेप्पी बॅकवॉटर

कोचीनपासून 53 किलोमीटर अंतरावर असलेले अलप्पुझा. अलप्पुझामध्ये बॅकवॉटर, पाम-फ्रिंग्ड तलाव, हिरवीगार भातशेती, रंगीबेरंगी सरोवर आणि 150 वर्ष जुने दिपस्तंभ आहे. केरळमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलप्पुझामधल्या हाउसबोट क्रूझ आनंददायी अनुभव देतात. या क्रूझमध्ये सुसज्ज बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायी लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, मासेमारीसाठी बाल्कनी अशा सर्व सुखसोयींनी सज्ज हॉटेल रूम्स असतात.

हेही वाचा: kojagiri purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व...

● मुन्नार 

सर्वात मोठ्या चहा बागांपैकी मुन्नार हे केरळमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय हिल-स्टेशन्सपैकी एक आहे. हे जगातील सर्वात मोठ्या चहाच्या मळ्यांचे व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाते. याशिवाय, मुन्नारमध्ये अनेक संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यात नीलगिरी, थार आणि नीलाकुरिंजी यांसारख्या स्थानिक आणि लुप्तप्राय प्रजातींचे घर आहे. मुन्नार मडुपेट्टी, नल्लाथन्नी आणि पेरियावरू या तीन नद्यांच्या काठावर वसलेले आहे.  

● वायनाड

मनमोहक धबधबे, ऐतिहासिक लेणी, आरामदायी रिसॉर्ट्स आणि निवासस्थानांसह, वायनाड हे लोकप्रिय शहर मसाल्यांच्या लागवडीसाठी आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील सर्वात सुंदर क्षेत्रांपैकी एक असलेल्या वायनाड येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक चांगला पर्याय आहे. वायनाड हा वनसंरक्षणाचा एक भाग तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर आहे.

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

● वर्कला

वर्कला मासे आणि धबधब्यांसाठी लोकप्रिय आहे. संत श्री नारायण गुरु यांची समाधी येथे आहे. हे शहर पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. वर्कला येथील पापनासम बीचला भेट देणे हा एक चांगला ऑप्शन आहे. कारण येथे पॅराग्लायडिंग आणि पॅरासेलिंगचा आनंद घेता येतो.

● थिरपराप्पू धबधबा

कन्याकुमारीपासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर असलेला  थिरपराप्पू धबधबा मानवनिर्मित आहे. त्याचे पाणी 50 फूट उंचीवरून कोसळते. या धबधब्याकडे जाताना प्रमुख प्रवेशद्वारावर भगवान शंकराचे एक छोटेसे मंदिर आहे. हे डेस्टिनेशन कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठीचे परफेक्ट डेस्टीनेशन आहे.