Walking Dead ते हवेत लटकणारे मृतदेह..जगातल्या विचित्र परंपरा

विविध भौगौलिक Geographical भागातील विभिन्न संस्कृतींमध्ये कायमच वेगळेपण पाहायला मिळतं. मात्र काही संस्कृती आणि परंपरा अशा आहेत ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतील
जगातल्या विचित्र परंपरा
जगातल्या विचित्र परंपराEsakal

प्रत्येक देशानुसार देशातच नव्हे तर प्रत्येक देशीतील विविध राज्य आणि भागांनुसार जशी भाषा बदलत जाते तसतशी वेगवेगळी संस्कृती देखील पाहायला मिळते. जगभरात असंख्या देश, धर्म, जाती जमाती आहेत. या प्रत्येकाची आपली एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. यातील काही संस्कृती अशा आहेत ज्यावर आजही विश्वास ठेवणं कठीण जातं. Know about Unusual cultures around the world Marathi News

प्रत्येकाची त्यांची संस्कृती जपण्यावर आणि परंपरेवर श्रद्धा आहे. आजच्या युगात शहरीकरणाने मानवाचं Human आयुष्य बदलंल असलं तरी आजही अनेक भागांमध्ये काही माणसांच्या समुदायांनी त्यांच्या संस्कृती कायम राखल्या आहेत. या संस्कृती Culture जपण्यामागे त्यांची काही कारणं आहेत. 

हे देखिल वाचा-

जगातल्या विचित्र परंपरा
Culture : सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्व व फायदे काय आहे?

विविध भौगौलिक Geographical भागातील विभिन्न संस्कृतींमध्ये कायमच वेगळेपण पाहायला मिळतं. मात्र काही संस्कृती आणि परंपरा अशा आहेत ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. अगदी मृतदेहांसोबत बाळांना फेकण्यापासून ते निखाऱ्यांवर चालणे अशाच काही विचित्र संस्कृती आणि परंपराबद्दल जाणुन घेऊयात.

वॉकिंग डेड- इंडोनेशियामध्ये ही विचित्र संस्कृती पाहायला मिळते. इथले टोराजा जमातीचे लोक मृतदेहांसोबतच वर्षानुवर्ष राहत आहेत. इंडोनेशियाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या दक्षिण सुलावसी भागातील लोक गेल्या अनेक शतकांपासून मृतदेहांना पुन्हा जीवित करण्यासाठी काही भोळसट परंपरा करत आहेत. त्यांच्यामते निधन झालेली व्यक्ती ही मृत नसून ती केवळ आजारी आहे. त्यामुळे या मृतदेहांना एका तात्पुरत्या शवपेटीत ठेवलं जातं. दर तीन वर्षांतून एकदा या मृतदेहांना शवपेटीतून बाहेर काढलं जातं. त्यांना नवे कपडे दागिने घातले जातात. यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येत सेलिब्रेशन केलं जातं. मृतदेहांसोबत फोटो काढले जातात. त्यांच्याशी संवाद साधला जातो. मुळात ती व्यक्ती आपल्यातच आहे असा समज असल्याने इथं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही शोक व्यक्त केला जात नाही. 

एल कोलाची बेबी जंपिंग- स्पेनमधील बर्गोस प्रांतातील सासामोन इथल्या एका गावात घरात बाळाच्या जन्मानंतर एक विचित्र पथा पार पाडली जाते. दरवर्षी इथं एल कोलाचो El Colacho  हा सण साजरा केला जातो. यालाच बेबी जंपिंग किंवा डेव्हिल जंपिंग फेस्टिव्हल देखील म्हणतात. या फेस्टिव्हलमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलांच्या त्यांची आई रस्त्यावर जमिनिवर अंथरण्यात आलेल्या एका गादीवर झोपवते. त्यानंतर काही विशिष्ट लोक या मुलांच्या अंगावून उड्या मारत जातात. उड्या मारणे हे लोक खास लाल आणि पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करतात. यातील एकालाच डेव्हिल मानलं जातं. हा डेविल सर्व मुलांला उड्या मारत ओलांडतो. यामुळे मुलांची सर्व पाप नष्ट होतात येत्या काळात ते कोणतही चुकीचं काम करत नाही असा यामागे समज आहे. ही प्रथा जवळपास ४०० वर्षजुनी आहे. अनेकांची यावर आजही श्रद्धा आहे. तर अनेकजण ही केवळ एक अंधश्रद्धा असून ते लहन बाळांसाठी धोक्याचं ठरू शकतं असं मानतात. 

हवेत लटकणारे मृतदेह- जगातील अनेक भागांमध्ये आजही मृत्यूनंतरही पुन्हा नवं जीवन मिळेल या आशाने अनेक प्रथा परंपरा जपल्या जातात. अशीच एक प्रथा चीनमध्येही पाहायला मिळते. चीनच्या गोनजियन भागात हवेत लटकणारी दफनभूमी पाहायला मिळते. होय. इथे उंचं पर्वतांवर शवपेट्या लटकलेल्या आहेत. पर्वतांवर लटकलेल्या या शवपेट्या हजारो वर्ष जुन्या आहेत. इथल्या एका आदिवासी जमातीने हजारो वर्षांपूर्वी या शवपेट्या या पर्वतांवर नेऊन ठेवल्या आहेत. हवेत शवपेट्या ठेवल्याने मृतव्यक्ती पुन्हा जिवंत होईल अशी त्यांची धारणा होती. 

बाळांना फेकणे Throwing Babies- बाळांना उंचावरून खाली फेकण्याची ही प्रथा महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका गावात पाहायला मिळते. इथं मंदिराच्या छतावरून म्हणजेच जवळपास ५० फूट उंचीवरून लहान मुलांना खाली फेकलं जातं. तर पायथ्याशी काही लोकं चादर घेऊन उभे असतात. ही लोकं या मुलांना चादरीत झेलतात. यामुळे मुलांना निरोगी आणि दिर्घायुष्य लाभतं आणि त्यांचं नशिब चमकतं, असा समज आहे. 

जळत्या निखाऱ्यांवरून पत्नीला नेणं- चीनमधील एका संस्कृतीनुसार घरात पहिल्यांदाच प्रवेश करण्यापूर्वी पतीने आपल्या पत्नीला उचलुन जळत्या निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा आहे. महिलेची प्रसूती सहज आणि सोपी होईल याची खात्री करून घेण्यासाठी ही प्रथा पार पाडली जाते.

जगभरात आजही अनेक भागात अशा वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. यातील काही प्रथांमध्ये काळानुसार बदल करण्यात आले आहेत. तर काही प्रथा आजही मोठ्या श्रद्धेने पूर्ण केल्या जात आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com