Human Psychology : तुम्हालाही झोपेत खाली पडल्याचे भास होऊन जाग येते का? जाणून घ्या कारण

आपला मेंदू सतत आपल्याला कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सतर्क असतो. त्याला हिप्नीक जर्क म्हणतात.
Human Psychology
Human Psychologyesakal

Hypnic Jerk Causes : बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की, झोपेत आपण खाली पडत असल्याचा भास होतो. त्यामुळे एक झटक्यात झोपमोड होते. पण जागे होताच तुम्ही स्वतःला बेडवरच झोपलेले असल्याचं बघतात. अशावेळी मग बऱ्याचदा प्रश्न पडतो की, असं का होत असेल? तर आज याचं कारण जाणून घेऊया.

खरंतर याला हिप्नीक जर्क म्हणतात. हा झटका तुम्हाला झोपेतून जागं करतो. याकाळात तुम्हाला भास आणि वास्तव यातलं अंतर समजत नसतं.

मेंदू शरीराला कंट्रोल करतो

आपल्या मेंदूला कायम शरीराला कंट्रोल करून ठेवण्याची सवय असते. मेंदूला शरीराच्या सर्व अवयवांची माहिती असते. कधी श्वास घेतो, कधी झोपतो सगळ्याचीच माहिती मेंदूकडे असते. आपला मेंदू एक प्रकारचा वॉचमन असतो. तो कायम आपल्याला कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सतर्क असतो. धोका जाणवताच तो ताबडतोब आपल्या शरीराला संरक्षणाचे सिग्नल पाठवत असतो.

Human Psychology
Human Psychology : कमी वेळात यशस्वी होण्यासाठी Critical Thinking आवश्यक, तज्ज्ञ सांगतात...

म्हणून लागतो झटका

याला हिप्नीक जर्क म्हणतात. आपण खाली पडत आहोत असा भास तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला झोप लागत असते, डोळे बंद होतात आणि हृदयाचे ठोके हळूवार पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याचदा मेंदू कंफ्यूज्ड होतो. आपला मृत्यू तर होत नाही ना असा संभ्रम मेंदूला होतो आणि तो ताबडतोब कार्यान्वीत होतो.

जागे करण्यासाठी स्मार्ट पद्धतीचा अवलंब

आपल्याला जागो करण्यासाठी मेंदू फारच स्मार्ट पद्धतीचा वापर करतो. मेंदू आपल्यात भास निर्माण करतो की, आपण उंचावरून पडत आहोत. अशात मेंदू पायाला सिग्नल पाठवतो आणि सिग्नल मिळताच एक झटका लागून आपण जागे होतो. अशा प्रकारे मेंदूचं काम पूर्ण होतं. आणि आपण जागे झाल्यावर जिवंत असल्याचं समाधान मेंदूला मिळतं. सगळं काही नीट आहे हे समजल्याने मेंदूपण नॉर्मल होतो आणि आपण पुन्हा कूस बदलून झोपून जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com