esakal | तुम्हाला अगदी स्वस्तात बाली ट्रिप करायची? मग टिप्स लक्षात ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

 know effective tips to reduce expenses of bali trip marathi article article

 स्वस्त परदेशी स्थळांसाठी बॅकपॅक ट्रिपचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे, पण इथेही सर्वात मोठी अडचण ठरते ती बजेटची.  ट्रिपमध्ये प्रवास, राहणे-खाणे या सर्वांचा विचार केल्यावर, अर्ध्या लोकांना पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन सोडून द्यावा लागतो. पण याला एक चांगला पर्याय आहे..

तुम्हाला अगदी स्वस्तात बाली ट्रिप करायची? मग टिप्स लक्षात ठेवा

sakal_logo
By
टीम ईसकाळ

एक नवीन ट्रेंड आजकाल तरूण पिढी फॉलो करत आहे आणि तो म्हणजे बॅकपॅक ट्रिपचा ट्रेंड. जॉर्डन ते जयपूर आणि स्विझल अ‍ॅल्प्स ते रत्नागिरी टेकडीपर्यंत भारतीय तरुण त्यांचे भटके मन शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  स्वस्त परदेशी स्थळांसाठी बॅकपॅक ट्रिपचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे, पण इथेही सर्वात मोठी अडचण ठरते ती बजेटची.  ट्रिपमध्ये प्रवास, राहणे-खाणे या सर्वांचा विचार केल्यावर, अर्ध्या लोकांना पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन सोडून द्यावा लागतो. पण याला एक चांगला पर्याय आहे..

तुम्ही फक्त 40 हजार आणि त्यापेक्षा कमी बजेटमध्ये बळी देखील बाली या ठिकाणाला आरामत फिरुन येऊ शकता आणि तेथे 5 दिवसांच्या सहलीचा देखील तुम्हाला आनंद घेता येईल. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरून जास्तीचा खर्च टाळता येईल. या पुढील टिप्स त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील. 

1. आपल्या शहरातच चलन रूपांतरित करा
आतापर्यंत परदेशात जाऊन सर्वात मोठी समस्या येते ती चलन बदलून घेण. जर आपण बँकेचे ट्रॅव्हल इंटरनॅशनल कार्ड वापरत असाल तर नक्कीच त्याचे बरेच फायदे होतील पण जर तुम्ही जास्त प्रवास केला नसेल आणि पहिल्यांदाच देशाबाहेर जात असाल तर चलन भारतातच रूपांतरित करुण घेणे चांगले राहील. आणि येथून बालिनीस रुपये न घेता डॉलर घ्या. तेथे भारतीय रुपयांची देवाणघेवाण झाली तर कमी दर होईल आणि फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. 

2. महागड्या रिसॉर्टच्या भानगडीत पडू नका
बाली मधील बरीच स्वस्त हॉटेल देखील चांगली आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजंट्सकडून कोटेशन मिळवा.  ट्रिपॅ एडव्हायझर किंवा कोराच्या मदतीने चांगल्या हॉटेलचा शोध घ्या. तुम्ही या ठिकाणी प्रश्न देखील विचारू शकता. कारण तुम्ही प्रवासात, फिरण्यामध्येच जास्त वेळ घालवाल, म्हणून एखाद्या महागड्या रिसॉर्टवर खर्च करण्यात अर्थ नाही.

3. जेवण कुठे करताय याची काळजी घ्या
बालीची सर्वात मोठी समस्या ही आहे की शाकाहारी लोकांना तेथे खायला चांगले पर्याय सापडत नाहीत. त्यासाठी स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्हाला तसे सांगावे लागेल. बरेच लोकल स्टॉप असे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यांमधून भारतीय जेवणापासून बलिनीजपर्यंत सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. महागड्या हॉटेलांमधील जेवण तुमच्या खीशाला जड पडू शकतं हे लक्षात असू द्या.

4 . स्थानिक पर्यटकांपासून सावध रहा
प्रत्येक मोठ्या पर्यटनस्थळांप्रमाणेच बालीलाही ही एक मोठी समस्या आहे आणि समुद्रकिनार्‍यावरील कोणाकडूनही किंवा कोणत्याही प्रसिद्ध पर्यटन स्थळावरुन काही विकत घेण्याचा विचार करू नका. आपल्याला ही वस्तू खूप महाग पडेल आणि तिची गुणवत्ता देखील योग्य होणार नाही. त्यापेक्षा बालीच्या स्थानिक बाजारात जाणे चांगले. आपल्या हॉटेलवाल्यांकडून सल्ला घ्या.

5 .  टूरिस्ट प्लेस स्वतः काळजीपुर्वक शोधा
सर्वप्रथम, बालीला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असताना, पर्यटन हंगाम लक्षात ठेवा. जर तुम्ही सुरुवातीच्या एवजी सिझनच्या शेवटी गेलात तर तुम्हाला ही ट्रिप स्वस्त पडेल. यासह, विदेशी टूरिस्ट स्पॉटमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका. याठीकाणी दुचाकी भाड्याने स्वस्त दरातही उपलब्ध होते. तुम्ही बालीमधील कमी प्रसिध्द असलेल्या ठिकाणांना भेट देऊ  शकता. 

loading image
go to top