Indian Railway : रेल्वेची प्रवाशांसाठी नवी सुविधा, केवळ ३५ पैशांमध्ये मिळेल १० लाखांची सुरक्षा

यापूर्वी रेल्वेचं तिकिट Railway Ticket बुक करत असताना सुरक्षा विम्याचा पर्याय दिला जातो. मात्र हा विमा घेणं बंधनकारक नव्हतं. त्यामुळे अनेकजण काही रुपयांची बचत करण्यासाठी विमा घेत नसत. मात्र आता रेल्वे प्रशासनाने IRCTC वरून तिकिट बुकिंग करत असताना इंशुरन्सची सुविधा बाय डिफॉल्ट केली आहे
रेल्वे प्रवाशांसाठी विमा
रेल्वे प्रवाशांसाठी विमाEsakal
Updated on

Indian Railway Insurance : जून महिन्यामध्ये ओडिसामधील बालासोर इथं झालेल्या रेल्वे अपघातामध्ये Railway Accident मोठ्या २९२ प्रवाशांनी जीव गमावला. या दुर्घटनेवर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक नवी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रवशांच्या सुरक्षेसाठी ही सुविधा देण्यात येत आहे. Know the Railway Passengers Insurance offer and its benefits

बालासोर दुर्घटनेत Balasore Railway Accident मृत प्रवाशांपैकी जवळपास ७० टक्के प्रवाशांनी रेल्वेकडून देण्यात येणारा सुरक्षा विमा Security Insurance न घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आता प्रवाशांनी तिकिट बुक केल्यानंतर तिकिटासोबत हा विमा मिळणार आहे. शिवाय यासाठी अत्यल्प किंमत मोजावी लागणार आहे.

यापूर्वी रेल्वेचं तिकिट Railway Ticket बुक करत असताना सुरक्षा विम्याचा पर्याय दिला जातो. मात्र हा विमा घेणं बंधनकारक नव्हतं. त्यामुळे अनेकजण काही रुपयांची बचत करण्यासाठी विमा घेत नसत.

मात्र आता रेल्वे प्रशासनाने IRCTC वरून तिकिट बुकिंग करत असताना इंशुरन्सची सुविधा बाय डिफॉल्ट केली आहे. म्हणजेच प्रवाशांना आता विमा घेण्यासाठीचा पर्याय निवडण्याची गरज नाही. तिकिटाच्या रक्कमेत या विम्यासाठी केवळ ३५ पैसे अधिक आकारण्यात येणार आहेत. तिकिट बुक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा विमा मिळणार आहे.

या सुरक्षा विम्याअंतर्गत कोणत्याही दुर्घटनेसाठी १० लाख रुपयांपर्यंतचं कव्हर देण्यात येणार आहे. म्हणजेच IRCTCवर तिकिट बुक करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता १० लाख रुपयांचा सुरक्षा विमा केवळ ३५ पैशांमध्ये मिळणार आहे.

हे देखिल वाचा-

रेल्वे प्रवाशांसाठी विमा
Byculla Railway Station : देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा! भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार

अनेक प्रवासी केवळ काही रुपयांची बचत करण्यासाठी पूर्वी विम्याचा पर्याय निवडत नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. यामुळेच प्रवाशांचं हित साधण्यासाठी हा पर्याय ऑटोमॅटिक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विमा न घेण्याचा पर्याय उपलब्ध

रेल्वे प्रशासन तिकिटासोबत केवळ ३५ पैसे आकारून १० लाख रुपयांचा विमा देत असली तरी प्रवाशांवर हा पर्याय लादण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण जरी तिकिट बुक करताना हा पर्याय ऑटोमॅटिक जोडला जात असला तरी या पर्यायातून बाहेर पडण्याचा मार्ग देण्यात आला आहे.

म्हणेजच बुकिंगच्या वेळी ऑप्ट आइट ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला विम्याचा पर्याय डिलीट करता येणार आहे. मात्र केवळ ३५ पैशांमध्ये मिळणारा १० लाखांचा विमा न घेणं ही प्रवाशांसाठी मोठी चुक ठरू शकते.

या विम्याअंतर्गत रेल्वे अपघातात जीवीतहानी झाल्यास किंवा दिव्यांग झाल्यास भरपाई दिली जाईल तर जखमींना उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च दिला जाईल.

दुखापतग्रस्तांना मिळणार २ लाख तर मृत्यूसाठी १० लाखांचं कव्हर

ITCTCने जारी कलेल्या संरक्षण विम्यासंदर्भातील मार्गदर्शक त्तवांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास जखमींना रुग्णालयातील खर्चासाठी २ लाख रुपयांचं कव्हर दिलं जाईल. तर कायमस्वरुमी आंशिक अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल.

तर रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचं संरक्षण दिलं जाईल. यामुळेच ऑनलाईन रेल्वेचं तिकिट बुक करत असताना आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या सुरक्षा विम्याचा पर्याय नक्की निवडा.

हे देखिल वाचा-

रेल्वे प्रवाशांसाठी विमा
Minnu Mani Railway Junction: घरी जायला रस्ता नाही, स्टेशनला दिले तिचे नाव! भारतीय महिला क्रिकेटरची अजब कहाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com