
ravan dahan tradition
esakal
जालौन, उत्तर प्रदेश: देशभरात दसऱ्याचा (विजयादशमीचा) सण आज साजरा होणार असला तरी, जालौन जिल्ह्यातील कोंच शहरात मात्र काल, बुधवारीच हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोंच शहरात राम-रावण आणि लक्ष्मण-मेघनाथाचे जिवंत युद्ध पाहायला मिळते. येथे ४० फूट उंच रावण आणि मेघनाथाच्या पुतळ्यांसोबत राम, लक्ष्मण आणि हनुमान प्रत्यक्ष युद्ध करतात. हे युद्ध रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेप्रमाणेच चित्तथरारक असते.