Ladakh Travel Tips: लडाखला फिरायला जायचा प्लॅन करताय! या 6 गोष्टी ठेवा लक्षात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ladakh
Ladakh Travel Tips: लडाखला फिरायला जायचा प्लॅन करताय! या 6 गोष्टी ठेवा लक्षात

Ladakh Travel Tips: लडाखला फिरायला जायचा प्लॅन करताय! या 6 गोष्टी ठेवा लक्षात

Ladakh Travel Tips: लडाखला जाण्याचं स्वप्न अनेकजण बघत असतात. लडाख हे सुट्टीसाठी आणि एडव्हेंचर स्पोर्ट्साठी उत्तम ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 3542 मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेले लडाख निसर्गाने वेढलेले आहे. एप्रिल महिना सुरू होताच लडाखमध्ये पर्यटन हंगाम सुरू होतो. तो जवळजवळ ऑगस्टपर्यंत चालतो. तुम्हालाही लडाखला जायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Maharashtra Government मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती,असा करा अर्ज

twitter shows leh

twitter shows leh

या ६ गोष्टी लक्षात ठेवा.

1) जर तुम्ही पहिल्यांदाच लडाखला फिरायला जाणार असाल तर पोहोचल्यावर पहिल्यांदा बाहेर पडू नका. माऊंटन सिकनेसमुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो.

2) लडाखचे हवामान काही मिनिटांतच बदलते, लगेचच थंडगार वारे वाहतात. अशा परिस्थितीत हलके उबदार कपडे सोबत ठेवा.

3) लेहला पोहोचल्यानंतर तुम्ही फिरण्यासाठी भाड्याने बाईक किंवा कॅब बुक करू शकता. येथे स्वयंचालित वाहने उपलब्ध नाहीत. तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही Activa किंवा Scooty बुक करू शकता.

हेही वाचा: योगी सरकारला दारूतून मिळाला 36 हजार कोटींहून अधिक महसूल!

Ladakh

Ladakh

4) लडाख हा नो प्लास्टिक झोन आहे, त्यामुळे इथे प्लास्टिक अजिबात वापरू नका. तसेच कचराही टाकू नका.

5) लडाखला पोहोचल्यावर कुठेही जाण्यापूर्वी वाहनांची माहिती ठेवा आणि परत या. तिथे पोहोचल्यावर परत येण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील, असे जरी काही नसले तरी वाहनांची माहिती असणे गरजेचे आहे.

6) जर तुम्ही लडाखला जाण्याचा विचार करत असाल तर किमान आठवडाभर राहण्याचा प्लॅन करा. तसा प्लॅन केलात तरच तुम्हालालडाखच्या सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येईल.

हेही वाचा: वजन कमी करण्यासाठी खा आरोग्यदायी ओट्स स्मूदी! जाणून घ्या फायदे

Web Title: Ladakh Trip Travel Tourism Complete Travel Guide For A Trip To Ladakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..