Lavasa City : हॉलिडे प्लॅनिंगसाठी ऑप्शन शोधता आहात? मग चहूबाजूंनी डोंगर असलेल्या लवासाबद्दल तुमचा काय विचार आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lavasa City

Lavasa City : हॉलिडे प्लॅनिंगसाठी ऑप्शन शोधता आहात? मग चहूबाजूंनी डोंगर असलेल्या लवासाबद्दल तुमचा काय विचार आहे?

Lavasa City : जर तुम्ही धिंच्याक पर्सन नाही आहात तर ही जागा फक्त तुमच्यासाठी आहे. लवासा हे आजूबाजूने जवळजवळ सात डोंगरांनी वेढलेल आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं शहर आहे.आपण अनेकदा अशा जागी जाणं पसंत करतो जिथे खूप शांतता असते, महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्या बद्दल अजून तितकीशी माहिती नाही, त्यामुळे इथे पर्यटकांची लेलचेल कमी असते.

हेही वाचा: Womens Jeans Style : फक्त २००० च्या आत असलेल्या या जिन्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत..

शिवाय अशा गुमनाम जागा एक्स्प्लोर करण्यात एक वेगळीच थ्रील आहे. कारण इथे आपण आपल्या असा वेगळ्या आठवणी तयार करू शकतो आणि त्याची मजा वेगळीच असते. जर तुम्ही अशाच एका जागेच्या शोधात असाल तर लवासा हे फार परफेक्ट आहे. लवासा 7 डोंगरात पसरलेल खूप सुंदर शहर आहे, हे शहर जवळजवळ 25 हजार एकर क्षेत्रात पसरलेल आहे.

हेही वाचा: Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

बघुया या जागेच्या बद्दल आणखीन काही

1. लेकशोर वॉटर स्पोर्ट्स - Lakeshore Watersports

लवासा वरसगाव धरणाच्या तटावर स्थित असल्याने इथे तुम्हाला अनेक वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटीज साठी स्पॉट्स मिळतील. इथे अनेक टुरिस्ट फिरायला येतात मुंबईहून तर लोक सतत इथे येयला प्लॅनिंग करतात. इथे जेट स्की, स्पीड बोट राईड, पायडल बोटिंग अशा अनेक स्पोर्ट्स ॲक्टिविटी तुम्ही करू शकतात. याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असते.

हेही वाचा: Cheese Pizza Dosa : घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल चीज पिझ्झा डोसा

2. घनगड किला - Ghangad Fort

मित्रांसोबत, जोडीदारासोबत किंवा फॅमिली सोबत जायला ही जागा परफेक्ट आहे. घनगड किल्ला ताम्हिणी घाटात आहे. इथे तुम्ही ट्रेकिंग करू शकतात. या किल्ल्यासाठी पेशव्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये खूप युद्ध झाले होते. तुम्ही या किल्ल्यावर मेडिटेशन सुद्धा करू शकतात.

हेही वाचा: How to Control Cholestrol : कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचंय? हे वाचाच

3. टेमघर डॅम - Temghar Dam

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे खूप हिरवळ असते. हे डॅम मुठा नदीवर स्थित आहे, इथे तुम्ही पिकनिक साठी येऊ शकतात. इथे चहा आणि कणसाचे अनेक स्टॉल आहेत त्यामुळे तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकतात. इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही कधीही येऊ शकतात.

हेही वाचा: Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

4. दासवे व्ह्यू पॉइंट - Dasve Viewpoint

व्ह्यू पॉइंट म्हटला की त्याबद्दल वेगळं सांगायला नको. कोणत्याही व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला निसर्गाचं वेगळच आणि प्रेमात पाडणारं रूप बघायला मिळतं. दासवे व्ह्यू पॉइंट असाच आहे, इथून आपल्याला सुंदर सरोवर, नद्या, डोंगर दिसत. इथे खूप प्रकारचे पक्षीसुद्धा दिसतात. शिवाय सनसेट आणि सनराईजची मजा घेऊ शकतात.

हेही वाचा: Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

5. देवकुंड वॉटरफॉल - Devkund Waterfall

देवकुंड वॉटरफॉल खूप सुंदर आहे. जवळजवळ 20 फुटावरून या धबधब्याचं पाणी पडतं. इथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग असे अॅडवेंचर सुद्धा करू शकतात. इथे खाण्याचे छोटे छोटे फूड स्टॉल सुद्धा आहेत. शिवाय तुम्ही इथे डबा पार्टी सुद्धा करू शकतात.