esakal | भारतातील 'या' सुंदर गावांविषयी तुम्हाला माहिती आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील 'या' सुंदर गावांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

भारतातील 'या' सुंदर गावांविषयी तुम्हाला माहिती आहे का?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

निशिगंधा क्षीरसागर

भारतात खूप नयनरम्य ठिकाणे आहेत. आपल्याला मुख्यत्वे हिल स्टेशन किंवा मोठ्या शहरांच्या आसपास असलेली ठिकाणेच माहिती आहेत. कुठे फिरायला जायचे म्हटले की, आपल्याला एखादे थंड हवेचे ठिकाण, बर्फाच्छादित शिखरे किंवा शांत समुद्रकिनारा असे नजरे डोळ्यासमोर येतात. हि ठिकाणे आपल्याला स्वर्गासारखी सुंदर भासतात. पण तुम्ही कधी कुठल्या गावात किंवा लहानशा खेड्यात फिरायला गेला आहात का? तुम्हाला प्रश्न पडला असेल कि एखादे लहानसे गाव हे कधी पर्यटन स्थळ असू शकते का? तर त्याचे उत्तर आहे हो. एखादे लहानसे खेडे सुद्धा नयनरम्य असे पर्यटनस्थळ असू शकते. चला तर मग जाणून घेऊया भारतातील अशा काही गावांबद्दल ज्यांचा समावेश सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये होतो. या स्थळांना भेट देऊन तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. (Learn more about beautiful villages in India)

मलाणा, हिमाचल प्रदेश

मलाणा, हिमाचल प्रदेश

मलाणा, हिमाचल प्रदेश

मलाणा हे गाव हिमाचल प्रदेशामध्ये असलेले छोटेसे गाव आहे. या गावाबद्दल सगळ्यात रोचक गोष्ट म्हणजे या गावाचे लोक भारताचे संविधान मानत नाहीत. येथील लोक फक्त गावामध्ये बनवलेल्या नियम आणि कायद्यांचेच पालन करतात. हे गाव कुल्लू च्या उत्तर-पूर्व भागात स्थित आहे. येथील सुंदरता आणि हिमालयाची शिखरे तुमच्या मनाला सुखद अनुभूती देतात. येथे फिरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजेच इथे तुम्हाला नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे फिरताना तुम्ही शहरी गोंगाटापासून दूर शांततेचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे या मलाणा गावाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

स्मित गाव, मेघालय

स्मित गाव, मेघालय

स्मित गाव, मेघालय

मेघालयची राजधानी शिलॉन्ग पासून अवघ्या ११ किमी वर वसलेले हे स्मित गाव. इथे तुम्हाला निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतील कारण हे गाव पर्वतांच्या मधोमध वसलेले आहे. या गावाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे गाव पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. त्याचबरोबर या गावाची आशियातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गावांमध्ये गणना केली जाते. येथील स्थानिक लोक मुख्यतः मसाल्यांची शेती करतात. तुम्ही पण या आशियातील सर्वात सुंदर , शांत आणि स्वच्छ गावाला एकदा भेट दिलीच पाहिजे.

मावलिगॉन्ग, मेघालय

मावलिगॉन्ग, मेघालय

मावलिगॉन्ग, मेघालय

हे गाव शिलॉन्गपासून जवळजवळ ९० किमीवर स्थित आहे. हे गाव खूपच स्वच्छ आणि चारी बाजुंनी हिरवळीने वेढलेले आहे. येथील नैसर्गिक दृश्ये बघून तुम्हाला आनंद मिळेल. या गावाची खासियत म्हणजे येथे तुम्हाला नैसर्गिकरित्या तयार झालेले रूट ब्रिज बघायला मिळतील. हे रूट ब्रिज मजनकेच झाडांच्या मुऴांपासून नैसर्गिकरित्या तयार झालेले पूल आहे. हे पूल संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध आहेत. हे बघण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. तुम्हीही तुमच्या परिवारासोबत इथे फिरायला जाऊ शकता.

खोनोमा गाव

खोनोमा गाव

खोनोमा गाव

हे गाव भारतातील कोहिमा शहरापासून जवळच २० किमी अंतरावर वसलेले आहे. हे गाव प्राकृतिक विविधतेसाठी ओळखले जाते. इथे विविध प्रकारचे जीवजंतू बघायला मिळतात. तसेच इथे झाडांच्या विविध प्रजाती देखील आहेत. याचबरोबर इतरही अनेक रंजक गोष्ट तुम्हाला या गावात बघायला मिळतील. इथे तुम्ही आरामात काही दिवस मुक्काम करून शांत तसेच विविध खाद्यपदार्थ चाखण्याची त्याबरोबर हातानी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचा आनंदही तुम्ही लुटू शकता. तसेच इथे गावातील आदिवासी समुदायाला भेटण्याची संधी तुम्हाला मिळते.

दिस्कित गाव, लडाख

दिस्कित गाव, लडाख

दिस्कित गाव, लडाख

हे गाव लडाखच्या लेह जिल्ह्यात आहे. येथील शांत वातावरण आणि विशाल पर्वतांमध्ये दिस्कित या गावची सुंदरता दडलेली आहे. खरेतर हे गाव भारतामध्ये जास्त प्रसिद्ध नाही आहे, कारण खूप कमी लोकांनाच या गावाचा परिचय आहे. पण हीच या गावाची खासियत ठरते. इथे तुम्ही असीम शांततेचा अनुभव घेऊ शकता. जास्त करून लोक इथे अध्ययन किंवा ध्यान धारणेसाठी येतात. त्यामुळे तुम्हालाही एकांत हवा असेल तर तुम्ही लडाख मधील या गावाला जरूर भेट देऊ शकता.

(Learn more about beautiful villages in India)