
Jyotirlinga Yatra Budget Packages: धार्मिक प्रवासात रस असलेल्या यात्रेकरूंसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेची उपकंपनी आयआरसीटीसीने मध्य प्रदेशातील ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांसाठी विशेष टूर पॅकेजेस सुरू केले आहेत. या ६ दिवस आणि ५ रात्रींच्या टूरमध्ये तुम्हाला भोपाल, उज्जैन, ओंकारेश्वर तसेच इतर पवित्र स्थळांची भेट घेता येईल.