
सुट्टीची चाहूल लागली की भटकंतीचा मोह अजिबात आवरता येत नाही. आणि जर लागून किंवा लॉन्ग वीकेंडची सुट्टी आली तर काही विचारायलाच नको.
यंदा १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन गुरुवारी येत आहे, त्यामुळे चार दिवसांचा लॉन्ग वीकेंड आला आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांचा आस्वाद घेण्यासाठी ही खास ४ दिवसांची ट्रिप प्लॅन करत असाल तर पुढे दिलेली Itinerary तुमच्यासाठीच आहे. या मध्ये महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणे, टेकड्या आणि काही शहरी पण धकाधकीच्या जीवनापासून लांब शांतता देणारी ठिकाणे आहेत.