esakal | धर्मशाळेत सुट्टी घालवत असाल, तर या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या !

बोलून बातमी शोधा

dharmshala
धर्मशाळेत सुट्टी घालवत असाल, तर या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या !
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः हिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यात धर्मशाळा पर्यटनासाठी एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील सुंदर टेकड्यांपासून पोशाख आणि अन्नापर्यंत सर्व काही पर्यटकांना आकर्षित करते. धर्मशाळा सोबतच आजूबाजूच्या भागातही बरीच चांगली ठिकाणे असून जिथे प्रत्येक पर्यटकांना जायलाच आवडेल. तर चला जाणून घेवू धर्मशाळा व त्याच्या आजूबाजुच्या पर्यटन स्थळांबद्दल..

हेही वाचा: कोरोनात प्रवास करतायं; सुरक्षेसाठी या नियमांचे पालन करा

कांगडा किल्ला

धर्मशाळेजवळ ऐतिहासिक स्थळ म्हणजे कांगडा किल्ला आहे. इतिहासाचे प्रतिक आहे. हा किल्ला विस्तृत पसरलेला असून यात मंदिरे, मशिदी, राजवाडे आहेत. या किल्ल्याबद्दलच्या महापुरुषांचा उल्लेख महाभारतातही देखील आहे. पौराणिक उल्लेखांव्यतिरिक्त, कांग्रा किल्ल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे. त्यापूर्वी जहांगीर आणि महाराजा रणजित सिंग यांनी देखील राज्य केले. परंतू 1905 मध्ये एका भयंकर भूकंपात कांग्रा खोऱ्यातील या किल्याचे भरपूर नुकसान झाले. आज ही ते अवशेष आहे, तरी देखील येथे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. धर्मशाळेपासून २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे.

पालमपूर हिल स्टेशन

धर्मशाला जवळील पालमपूर हे एक लहान हिल स्टेशन आहे. परंतू पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून येथे चहाचे मळे, देवदार वृक्ष येथे भरपुर प्रमाणात दिसतील. पालमपूरमधील हवामान वर्षभर आनंददायी असते तर हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. इथल्या चहाच्या बागा बघण्यापासून तुम्ही इथल्या सुंदर मंदिरांना देखील तुम्ही भेट देऊ शकता.

बीर

बीर हे भारतातील एक उत्तम पॅराग्लाईडिंग साठी प्रसिध्द आहे. हे धर्मशाळेपासून काही अंतरावर आहे. बीर बिलिंगमधील पॅराग्लाइडिंग केवळ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकर्षित करते. वर्षानुवर्षे हे छोटेसे गाव हिमाचलमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून उदयास आले आहे. येथे पॅराग्लाइडिंग व्यतिरिक्त, आपण फिशिंग, चहाच्या बागा तुम्ही बघू शकतात. तसेच ट्रेकिंग ही करू शकता.

चंबा

रवि नदीच्या काठावर वसलेला चंबा हिमाचलमधील सर्वात पसंतीची जागा आहे. हे धर्मशाळेपासून सुमारे १ km० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. येथे अनेक मंदिरे तसेच महल आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. हे हिल स्टेशन त्याच्या ऐतिहासिकतेसाठी देखील पसंत केले आहे. दुसर्‍या शतकात हा प्रदेश कोलियन जमातीच्या ताब्यात होता. येथे कलाटॉप वन्यजीव अभयारण्य असून यामध्ये ट्रेकिंग आणि बोट राइड करू शकतात.