esakal | पठाणकोटमधील या प्रसिध्द ठिकाणांना नक्की भेट द्या !
sakal

बोलून बातमी शोधा

 Nurpur Fort

पठाणकोटमधील या प्रसिध्द ठिकाणांना नक्की भेट द्या !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः पंजाब (panjab) मध्ये पठाणकोट (Pathankot) अतिशय सुंदर शहर असून इतिहास देखील लाभलेला आहे. तसेच पर्यटनासाठी (Tourism) देखील उत्तम ठिकाण येथे आहे. पठाणकोट येथे अनेक सुंदर मंदिरे (tempal) आहेत. या व्यतिरिक्त, येथे हिरवळ आणि उत्कृष्ट देखावे आपल्याला आकर्षित करतील. तर चला जाणून घ्या पठानकोटमधील उत्तम ठिकाणांची माहिती. (famous tourism places pathankot information)

हेही वाचा: आता गोव्यात घ्या बंजी जंपिंगचा आनंद, आणखी नवे डेस्टीनेशनही पहा

मुक्तेश्र्वर मंदिर

पठाणकोटमधील प्रसिध्द मुक्तेश्वर मंदिर असून हे पठाणकोटपासून 22 कि.मी. अंतरावर आहे. हे मंदिर सर्वात पवित्र स्थान मानले जाते. हे मंदिर शंकराचे असिून अनेक वर्षाचे जुने बांधकाम आहे. एका शिखरावर वसलेले आहे. पठाणकोटमधील या मंदिराला भेट देणे हा एक उत्तम उपक्रम मानला जातो.

हेही वाचा: जर तुम्हाला सोलो ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर ट्रॅव्हलींगचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडचा रूपकुंड आहे बेस्ट

नूरपूरचा किल्ला

पठाणकोट फिरण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे धील नूरपूरचा किल्ला आहे. पठाण राजपूतांच्या कारकिर्दीतील हा किल्ला इतिहास दाखवतो. किल्ल्याचे नावमागे देखील कथा असून शाहजहांने हे आपल्या पत्नी नुरजहांच्या नावावर हा किल्याचे नाव ठेवले आहे. किल्ल्याच्या आत एक कृष्णा मंदिर आहे जे प्राचीन काळापासून आहे. भूकंपामुळे किल्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील हा किल्ला शेकडो पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करत आहे.

हेही वाचा: भारतातील काही विलोभनीय पर्यटनस्‍थळे

शाहपूरकांडी किल्ला

पठाणकोट जवळ शाहपूरकांडी किल्ला देखील तुम्ही पाहू शकता. पठाणकोट शहराच्या हद्दीवरच हा शाहपूरकांडी किल्ला आहे. हा किल्ला रवि नदीवर वसलेला आहे आणि इथे अनेक सुंदर लँडस्केप आहेत जे तुम्हाला पूर्णपणे मंत्रमुग्ध करतील. हा किल्ला शाहजहांच्या प्रमुखांनी बांधला होता. किल्याच्या एका बाजूने आतमध्ये रेस्टहाऊस असून तेथे मुक्कामाचा आनंद तुम्ही घेवू शकतात.

(famous tourism places pathankot information)