'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून !

'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून !

जळगाव ः प्राचीन काळापासून (Ancient times) मध्ययुगीन काळापर्यंत भारतात (India) नेक वाड्या, इमारती (Buildings), किल्ले (Fort), पॅलेस (Palace) आहे. जेथे विदेशी पर्यटकांसह भारतीय पर्यटक पाहण्यासाठी नेहमी गर्दी असते. त्यात दक्षिण भारतातील (South India) बंगळुरू (Bangalore) शहरामधील हा जूना राजवाडा आहे. तो 'बेंगलुरू पॅलेस' (Bengaluru Palace) म्हणून ओळखला जातो. हा पॅलेस पर्यटकांचा आवडीचे ठिकाण आहेच याच सोबत चित्रपट चित्रीकरणासाठी देखील या पॅलेसला पसंती चित्रपट निर्माता देतात. येथे अनेक बाॅलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण (Bollywood Film shooting) झालेले आहे. तर चला जाणून घेवू अशा सुंदर ऐतिहासिक पर्यटन स्थळा बद्दल..(india beautiful bengaluru palace famous bollywood film shooting)

राजवाड्याचा असा आहे इतिहास

बंगळुरू पॅलेसच्या इतिहास बद्दल अनेक ठिकाणी नोंदी आहे. त्यात हा वाडा सर्वात पहिले शाळा होता. त्यावेळी या शाळेचे मालक आणि प्राचार्य रेव्हरेंड गॅरेट होते. तत्कालीन राजा चामराजेंद्र वाडियार यांनी ते रेवरेन्ड गॅरेटमधून विकत घेतले. ते खरेदी केल्यावर राजाने बेंगळुरू पॅलेस म्हणून त्याचे बांधकाम सुरू केले. सुमारे 1874 ते 1878 पर्यंत हे पूर्णत्वास गेले. कालांतराने या राजवाड्यात दरबार हॉलसारख्या अनेक इमारतीही बांधल्या गेल्या. वडियार हे त्यावेळी दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली राजवंश होते.

हेही वाचा: कृउबातील गर्दी नियंत्रणासाठी पोलीस अधिक्षकांनी हाती घेतले सुत्र!

आकर्षक बांधकाम..

राजवाड्याचे बांधकाम अतिशय आकर्षक आहे. बांधकाम ट्यूडर आणि स्कॉटिश शैलीने बांधलेले दिसून येते. हा राजवाडा लंडनमधील विंडसर वाड्याप्रमाणेच दिसतो असे देखील म्हतले जाते. वाड्यात 35 पेक्षा जास्त खोल्या आहेत. टेरेस आणि भिंत वेगवेगळ्या पेंटिंग्ज आणि पेंटिंग्जने सजावट आहे. तसेच लाकडाने बनविलेल्या उत्कृष्ट वस्तू आहे.

येथे देखील फिरू शकतात

बेंगळुरू पॅलेसला भेट दिल्यानंतर अनेक फिरण्यासाठी बंगळूर शहरात सुंदर ठिकाणे आहेत. यात लाल बाग, नंदी टेकड्या, उलसूर लेक आणि देवनाहली किल्ला यासारख्या उत्तम ठिकाण आहे.

हेही वाचा: थरारक घटना..पाल जवळ दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

या चित्रपटांची झाली शुंटीग

या वाड्यात फक्त एकच नाही अनेक हिंदीसह अन्य भाषेतील चित्रटांची शुटींग झाली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये जो जीत वही सिकंदर, कुली आणि बरसात या सारख्या बऱ्याच सुपरहिट चित्रपट शुटींग झाले आहे. या राजवाड्यात अनेक परदेशी कलाकारांनीही परफॉर्मन्स दिले आहेत. असे म्हणतात की राजवाडा सध्या श्रीमती देवी वाडियार यांच्या मालकीचा आहे.

( india beautiful bengaluru palace famous bollywood film shooting)

Web Title: Marathi News Jalgaon India Beautiful Bengaluru Palace Famous Bollywood Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bollywoodbengaluru palace
go to top