esakal | भारतातील प्रसिध्द 'फूलांची दरी'; जायचयं पाहायला, तर मग वाचा !

बोलून बातमी शोधा

भारतातील प्रसिध्द 'फूलांची दरी'; जायचयं पाहायला, तर मग वाचा !
भारतातील प्रसिध्द 'फूलांची दरी'; जायचयं पाहायला, तर मग वाचा !
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः अनेकांना विविध ठिकाणी फिरायला आवडत असते. त्यात कोणी ट्रकींग, मंनोरजन, निसर्ग पाहण्यासाठी फिरत असतो. परंतू अनेकांना फुलांमध्ये भटकंती करण्यास आवडत असून अशा पर्यटकांसाठी उत्तराखंडकडे येथील 'व्हॅली ऑफ नॅशनल पार्क' हे उत्तम स्थळ आहे. येथील विविध फुल, फुलांच्या दरी पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या घाटीला भेट देतात.

भारतामधील थोड्याच लोकांना या ठिकाणाची माहिती असून हे सिक्किमच्या ईशान्य राज्यात एक ठिकाण आहे. ज्याला 'फूलांची दरी' म्हणून देखील ओळखले जाते. सिक्किममधील गंगटोक शहरापासून काही अंतरावर यमथांग व्हॅली आहे चला जाणून घेवू या व्हॅलीबद्दल..

२५ हून अधिक फुलांच्या प्रजाती

समुद्रसपाटीपासून 3 हजाराहून अधिक उंचीवर यमथांग व्हॅली वसलेली आहे. सिक्किमसह संपूर्ण उत्तर-पूर्वेसाठी एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. कोणत्याही निसर्ग प्रेमी आणि पर्यटकांसाठी हे आवडीचे ठिकाण आहे. यमथांग व्हॅलीमध्ये 25 हून अधिक फुलांच्या प्रजाती आहे. येथे रोडोडेंड्रॉन, बुरानश फुले पाहण्यास मिळतात. तसेच पुष्कळ फुलं आहेत, ती औषधासाठी वापरली जातात.

दरीचे सौंदर्य

यमथांग व्हॅली सौंदर्याच्या बाबतीतही उत्कृष्ट आहे. या खो दरी जवळ असणारी उंच पर्वत आणि घनदाट जंगले हे पर्यटकांना आकर्षित करतात. या खोऱ्या शेजारील तीस्ता नदी असून अनेक धबधबे देखील आहेत. जिथे आपण कुटूंब, मित्र किंवा जोडीदारासह फिरायला जाऊ शकता

फिरण्यासाठी आहेच बरेच ठिकाणे

यमथांग व्हॅली सोबतच येथे फिरण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहे. यात हिमालय प्राणीशास्त्र पार्क, हनुमान टोक आणि ताशी व्यू पॉइंट यासारख्या सुंदर ठिकाणी आहे. या ठिकाणांना भेट देण्याव्यतिरिक्त ट्रेकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद तुम्ही घेवू शकतात.

कधी जायचे

या घाटात फिरण्यासाठी तुम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 या दरम्यान कधीही जाऊ शकता. चीन सीमेजवळ असल्याने अनेक वेळा येथे फिरण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानग्या घेणे आवश्यक असते. येथे भेट देण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे फेब्रुवारी ते जून आहे. जवळचे रेल्वे स्टेशन लाचुंगला उतरून येथे फिरण्यासाठी ऑटो किंवा कॅबने घेवून जाऊ शकता.