esakal | भारतातील ही आहेत चमत्कारी मंदिरे..!
sakal

बोलून बातमी शोधा

balaji tempal

भारतातील ही आहेत चमत्कारी मंदिरे..!

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतात (india) सुमारे 60 हजाराहून अधिक देवी-देवतांचा मंदिर असतील. दर चार चरणांत एक पवित्र मंदिर (tempal) हमकास आपणास पाहण्यास मिळेल. त्यामुळे जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) ते कन्याकुमारी (Kanyakumari) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) ते गुजरात (Gujarat) पर्यंत असे एका पेक्षा एक पवित्र मंदीर आहे. त्यात असे काही चमत्कारिक मंदिर (Miraculous temple) आहे, तेथे रात्रंदिवस भक्तांची गर्दी असते. तर चला जाणून घेवू अशाच काही चमत्कारी मंदिरांबद्दल...(india most papular god miraculous temple information)

हेही वाचा: पुष्करमध्ये ब्रह्म देवाचे आहे सर्वात जुने मंदिर ! आणि त्यामागे आहे रंजक कथा

बालाजी मंदिर

आंध्रप्रदेशातील तिरुमाला टेकडीवर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे दक्षिण-भारतासाठी सर्वात चमत्कारी आणि मंदिरे म्हणून ओळखले जाते. याची व्यंकटेश्वर मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी येथे भावीक आपले केस या मंदिरात अर्पण करतात. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की व्यंकटेश्वराची पाठ साफ केल्यावर आपोआप ती ओली होते. तसेच श्री वेंकटेश्वर जीच्या पाठीवरील कान लावून ऐकल्यास समुद्रासारखा आवाज ऐकू येतो, जे चमत्कारापेक्षा कमी नाही.

महाकालेश्वश मंदिर

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील महाकालेश्वर मंदिर भगवान शंकरांचे सर्वात पवित्र आणि चमत्कारी मंदिर मानले जाते. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की जेव्हा जेव्हा भगवान शिवांची आरती होते तेव्हा या आरतीमध्ये त्यांना मृतांच्या अस्थींनी शोभले जाते. जर भाविकांनी येथे खरोखरच शिवभक्ती केली तर त्यांची इच्छा पूर्ण होईल. हे मंदिर तंत्र-मंत्रांच्या दृष्टीने देखील एक चमत्कारी मंदिर आहे.

हेही वाचा: मध्य प्रदेशातील हे आहे 'हाॅरर' ठिकाण..जेथे जाणे साहसापेक्षा कमी नाही !

कामाख्या देवी

आसामची राजधानी गुवाहाटीत प्रसिध्द दुर्गा देवीचे कामाख्या देवी आहे. हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. असे मानले जाते की या मंदिरात योनीतून रक्ताचा स्त्राव खडकाच्या रूपात आहे, जो कोट्यावधी भाविकांसाठी चमत्कार करण्यापेक्षा कमी नाही. रक्ताच्या स्रावामुळे मंदिराचा दरवाजा देखील कित्येक दिवसांपासून बंद असतो. हे मंदिर तांत्रिक शक्ती म्हणूनही ओळखले जाते.

अंबा माता मंदिर

गुजरात राज्यातील जुनागड शहरात अंबा माता मंदिर हे दुर्गा देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे. डोंगरावर बांधलेले हे मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. असे म्हटले जाते की गुजरात तसेच इतर राज्यातील लोक नव्याने विवाहित जोडप्यास दर्शनासाठी आणतात.

(india most papular god miraculous temple information)