esakal | अंदमान-निकोबारवरील नील बेट अतिशय सुंदर..जाणून घ्या माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

अंदमान-निकोबारवरील नील बेट अतिशय सुंदर..जाणून घ्या माहिती

अंदमान-निकोबारवरील नील बेट अतिशय सुंदर..जाणून घ्या माहिती

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतातील (India) सर्वातील सुंदर समुद्र किनारे (beach) आणि सुंदर बेट (Island) म्हणून अंदमान आणि निकोबाराची (Andaman and Nicobara)ओळख आहे. येथील समुद्रकिनार्‍यावर शांतता आणि समुद्र किनाऱ्यांवरील निर्सग सौंर्दय सर्वांना भुरळ पाडते. असेच या बेटावरील स्थित नील बेट आहे. जे लहान, परंतु अतिशय सुंदर बेट आहे. हे अंदमानच्या दक्षिणेस आहे. कोरल रीफ आणि उत्कृष्ट जैवविविधतेमुळे हे अंदमानमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी आहे. चला जाणून घेवू या सुंदर बेटाबद्दल...

(interesting information about nile island on andaman nicobar)

शदीद बेट म्हणून ओळख..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानच्या तीन बेटांचे नाव बदलण्याची घोषणा 2018 मध्ये केली. यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहितांना त्यांनी रॉस आयलँड, हेव्हलोक आयलँड आणि नील आयलॅडचे नामकर केले होते. यात निल बेटांचे आता शहीद बेट म्हणून ओळखले जाते. तर रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट आणि हव्हेलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप असे नाव देण्यात आले.

भाजी वाडगा

फुड प्रेमींसाठी नील बेट किंवा शहीद द्विप हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. यांना अंदमानची भाजी वाटी म्हणतात. जसा हावेलाॅक आयलँड सीफूडसाठी लोकप्रिय आहे. तसेच नील आयलँड वर शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. सर्व ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी नील केंद्राचा स्थानिक बाजार हा उत्तम स्थान आहे. शाकाहारी आणि शाकाहारी व्यतिरिक्त आपल्याला चिनी, इस्त्रायली, कॉन्टिनेंटल, नेपाळी आणि इटालियन खाद्यपदार्थांचा पर्याय आहे.

हावडा ब्रिज

आपल्याला कोलकाताचा हावडा ब्रिज माहिती असेलच पण नील बेटावरही हावडा ब्रिज आहे. मोठ्या दगडांनी बनलेला हा नैसर्गिक पूल नील बेटातील आकर्षणांपैकी एक ठिकाण आहे. नील बेटावर स्थायिक झालेल्या बंगाली लोकांनी प्रथम त्याचे नाव रवींद्रनाथ सेतू ठेवले आणि त्यानंतर हावडा ब्रिज असे नाव पडले.

सुभाष मेळा

नील द्विपच्या प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे सुभाष मेळा असून हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित केला जातो. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेष परिधान करून स्थानिक लोक पारंपारिक अन्न शिजवतात आणि पर्यटकांसमवेत असते.

समुद्रकिनारांचे नावे

नील बेटाचे लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांचे नावे लक्ष्मणपूर, भरतपूर, सीतापूर बीच आहेत ती रामायणातील पौराणिक पात्रांनी प्रेरित आहेत. सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यापैंकी एक आहे आणि सर्व समुद्रकिनाऱ्यांवर उत्तम रिसॉर्ट्स येथे आहेत. स्नोर्कलिंग, जेट स्कीइंग आणि स्कूबा डायव्हिंग इत्यादी अशा किनाऱ्यांवर आपण करू शकता.

loading image