esakal | ओडीशाचे मयुरभंज हनीमूनसाठी आहे परफेक्ट ठिकाण..
sakal

बोलून बातमी शोधा

Mayurbhan

ओडीशाचे मयुरभंज हनीमूनसाठी आहे परफेक्ट ठिकाण..

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः ओडिशा (Odisha) हे अतिशय सुंदर नैसर्गिक राज्य आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरजवळ मयुरभंज हा एक छोटासा अतिशय सुंदर जिल्हा आहे. येथील हवामान (Weather) खूप अतिशय चांगले असल्याने येथे पर्यटनासाठी ओडीशातून नव्हे तर संपूर्ण भारतातून पर्यटक मयूरभंजला (Mayurbhanj) येत असतात. इथे बर्‍याच आकर्षक ठिकाण असून निसर्गाच्या अदभूत अनुभव तुम्हाला येथे नक्की मिळेल तर चला जाणून घेऊ या ठिकाणाबद्दल..

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा सिमलीपाल जंगलातील उदाला विभागात आहे. तो भारतातील जूना धबधबा पैरी एक आहे. या धबधब्या जवळ दुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे.

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान

बारीपाड्याच्या जवळ सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे केवळ 17 किलोमीटर अंतरावर आहे. या उद्यानाचा परिसर मोठा असून हे व्याघ्र प्रकल्प आहे. येथे हिरव्यागार व घनदाट जंगल आणि वन्य प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तसेच विविध प्रकारचे प्रकारचे पक्षी देखील आढळतील. तसेच येथे बरीहिपाणी आणि डोरंडा धबधबे देखील आहेत जे पर्यटकांना खास आकर्षीत करतात.

मयूरभंजला असे जाता येते

मयूरभंजला जाण्यासाठी रेल्वे, विमान आणि वाहनाने देखील जाऊ शकता. जवळचे रेल्वे स्टेशन हे बारीपाडा-हावडा-चेन्नई रेल्वे कॉरिडोरला जोडलेले असल्याने भुवनेश्वर आणि कोलकाता नियमित गाड्या आहे. कोलकाताहून रेल्वेने मयूरभंजच्या बारीपाडाला जावू शकता. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 195 कि.मी. अंतरावर असून विमानाने भुवनेश्वरला पोहोचू शकता. तसेच रस्त्याने यायच म्हतल तर संबलपूर, पुरी, बोलंगीर, झारग्राम, अंगुल, रांची मार्गावरून येवू शकतात. तसेच कोलकाता आणि ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित बसची सुविधा देखील आहे.

या महिन्यांमध्ये जावे

तुम्हाला भेट मयुरभंजला जावे असे वाटत असेल तर येथे सप्टेंबर ते मार्च दरम्यान जाण्याची उत्तम वेळ आहे. या महिन्यांत इथले हवामान खूपच आनंददायक असते आणि पर्यटकांना फिरणेही सोपे जाते.

loading image
go to top