esakal | पावसाळ्याच्या सुंदर वातावरणात मान्सून पॅलेस पाहण्याची मजा काही वेगळीच
sakal

बोलून बातमी शोधा

monsoon-palace-udaipur

पावसाळ्याच्या सुंदर वातावरणात मॉन्सून पॅलेस पाहण्याची मजा काही वेगळीच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत असे काही राजवाडे, किल्ले आणि वाडे भारतात बांधले गेले होते; जे आजही जगप्रसिद्ध आहेत. मध्ययुगीन काळात बांधलेल्या राजवाड्यांबद्दल किंवा राजवाड्याचा (palace in udaipur) उल्लेख येतो, तेव्हा राजस्थानचे नाव नक्कीच घेतले जाते. या राज्यातील उत्कृष्ट आणि जगातील प्रसिद्ध राजवाडे अजूनही लाखो पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करीत आहेत. असे अनेक राजवाडे आहेत जे युनेस्को हेरिटेजमध्ये समाविष्ट आहेत. राजस्थानातील उदयपूरमध्ये असाच एक वाडा आहे; जो पर्यटकांसाठी अजूनही एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. आम्ही "मॉन्सून पॅलेस'बद्दल (monsoon palace udaipur) सांगत आहोत. या वाड्याविषयी जे काही नमूद केले आहे, ते कमी आहे. (tourism-news-know-the-history-of-monsoon-palace-udaipur)

राजवाड्याचा इतिहास

मॉन्सून पॅलेस हा सज्जनगड पॅलेस (udaipur to sajjangarh) म्हणूनही ओळखला जातो. मुख्य शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मॉन्सून पॅलेस निर्माण कार्याची सुरुवात सज्जनसिंग यांनी केली होती. पण, कालांतराने सज्जनसिंग यांचा मृत्यू झाला आणि राजवाड्याचे काम थांबले. त्यानंतर महाराणा फतेहसिंग यांनी 1884 च्या सुमारास या वाड्याच्या कामास पुन्हा सुरवात केली. सुमारे दहा वर्षांनंतर हा राजवाडा पूर्ण झाला. (history of monsoon palace)

पॅलेस आर्किटेक्‍चर

आश्‍चर्यकारक राजवाडा पाहणे हे देखील पर्यटकांचे एक प्रमुख केंद्र असू शकते. हा वाडा संगमरवरी दगडांनी बांधला आहे. या राजवाड्यात मुघल स्थापत्य (sajjangarh palace udaipur) वास्तू कलेपासून ते मेवाडी पोर्ट्रेट शैली सहज दिसते. या महालाच्या आत बरीच उद्यानेही अस्तित्वात आहेत, जे त्यास आणखी विशेष बनवतात. या राजवाड्याच्या छतावर एक तोफ देखील आहे, जी सहज दिसते. (history of monsoon palace udaipur)

इतर माहिती आणि तिकीट

असं म्हणतात, की पावसाळ्याच्या काळात अरवलीच्या रमणीय आणि उंच पर्वतांनी आणि ढगांनी वेढलेला हा वाडा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. या वाड्याजवळील तलाव देखील अधिक सुंदर आहे. तिकिटाविषयी सांगायचे झाले तर, तर भारतीय पर्यटकांसाठी तिकिटाची किंमत दहा रुपयांच्या आसपास आहे आणि (monsoon palace entry fee) परदेशी पर्यटकांसाठी 1550 रुपये आहे. इथं फिरण्यासाठी मॉन्सून ही चांगली वेळ मानली जाते.

राजवाडा बांधण्यामागची कथा

राजवाड्याच्या बांधकामाविषयी जाणून घेतल्यानंतर पावसाळ्यात इथे नक्कीच भेट द्यायला हवी. राजवाडा बनवण्याच्या मागे एक कथा दडली आहे. असे म्हणतात, की हा राजवाडा अशा ठिकाणी बांधला गेला होता, जिथून महाराणा फतेहसिंगचा राजवाडा म्हणजेच चित्तोडचा किल्ला दिसतो. दुसरे कारण असे की, पॅलेस अशा ठिकाणी आणि उंच ठिकाणी बांधले पाहिजे जिथून ढग पाहता येतील आणि उदयपूरच्या हवामानाचा पुरेपूर आनंद लुटता येईल.