

Mukhyamantri Tirth Darshan Yojana
esakal
मध्य प्रदेश सरकारची 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडवून आणण्यासाठी राबवली जाते. २०१२ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना विशेष ट्रेनद्वारे तीर्थयात्रा करता येते. प्रवासासोबतच राहणे, जेवण, पिण्याचे पाणी आणि आवश्यक स्थानिक प्रवासाचा खर्चही सरकार आणि IRCTCकडून केला जातो.