esakal | भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला सुरुवात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भंडारा : मागच्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीवर मात करण्यासाठी व संसर्गाला आळा घालण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आले होते. १ ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पिटेझरी गेट येथून पर्यटकांच्या वाहनाला वनपरिक्षेत्र अधिकारी स. गो. अवगान, साहाय्यक वनसंरक्षक, पी. एस. आत्राम, पक्षिनिरीक्षण व निसर्ग संवर्धक किरण पुरंदरे, सर्व वन विभाग कर्मचारी आणि पर्यटकांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

२६ ते ३० जूनपर्यंत रस्त्यांची स्थिती पाहून पर्यटन सुरू करण्यात आले होते; मात्र १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत दरवर्षीप्रमाणे अंतर्गत व्यवस्थापनाच्या दृष्टीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद ठेवण्यात आले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन शुक्रवार, १ ऑक्टोबरपासून मर्यादित वाहन क्षमतेत सुरू करण्यात आले.

हेही वाचा: सहा वर्षीय मुलाचे अपहरण; लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सफारीचा कोटा शिल्लक असल्याने ऑफलाईनद्वारेही बुकिंग करून सफारी करण्याचा आनंद घेतला, अशी माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालकांनी सांगितले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे आभासी सफारी आरक्षण व निवास व्यवस्था संकेतस्थळावरून सुरू करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण राज्य शासन, स्थानिक जिल्हा प्रशासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोरोनासंदर्भातील सूचनांचे पालन करून पर्यटकांनी जंगल सफरीला सुरुवात केली. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा वनभ्रमंतीची संधी मिळाली असल्याने राज्यभरातील वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे पिटेझरी वाशी यांचा रोजगार हरवला होता. आता सुरू झालेल्या जंगल सफारीमुळे स्थानिकांना पुन्हा रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. पर्यटकांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक पर्यटकांनी या ठिकाणी येऊन जंगल सफारीचा आंनद घ्यावा.
- सदाशिव गो. अवगान, वनपरिक्षेत्र अधिकारी, पिटेझरी

हेही वाचा: विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभयारण्यात विस्तृत जैव विविधता अस्तित्वात आहे. पावसाळ्यामुळे अभयारण्यातील हिरवेगार सौंदर्य अधिकच खुलून निघाली आहे; त्यामुळे येथे वास्तव्यास असलेले व हिमालयातून येणारे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.
- किरण पुरंदरे, पक्षिनिरीक्षण व निसर्ग संवर्धक
भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तांदळाच्या खरेदीसाठी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पिटेझरी येथील जंगल सफारी विषयी माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही इथे पर्यटनासाठी आलो. भंडारा जिल्ह्यातील परिसर फारच सुंदर व हिरवेगार आहे.
- तुषार सोनवणे, पर्यटक, जळगाव
loading image
go to top