October Travel 2025: जर तुम्हीही मित्र- परिवारासोबत कुठे तरी फिरायला जायचं विचार करत असाल, तर ऑक्टोबर महिना यासाठी उत्तम आहे. हा महिना म्हणजे सण-उत्सवांचा काळ. .हवामानही या वेळेस थोडं थंड, आल्हाददायक होतं आणि प्रवासासाठी योग्य वातावरण तयार होतं. अनेकजण या महिन्यात एखादी छोटी ट्रिप, धार्मिक यात्रा किंवा फॅमिली आऊटिंगची योजना आखतात. विशेषतः लॉग वीकेंड्स असतील, तर सहल अधिक मजेशीर होते. चला तर जाणून घेऊयात लॉग विकेंडच्या तारखा कोणत्या आहेत..Dussehra Decoration Tips: दसऱ्याला 'अशा' प्रकारे सजवा घर आणि कार्यालय, सर्वजण करतील कौतुक!.ऑक्टोबर मधील लॉग विकेंड तारखापहिला विकेंड२ ऑक्टोबर ( गुरुवार) गांधी जयंती ( सार्वजनिक सुट्टी)३ ऑक्टोबर ( शुक्रवार ) - ऑफिसमध्ये सुट्टी टाका४ आणि ५ ऑक्टोबर ( शनिवार- रविवार) वीकेंड४ दिवसाची करा ट्रिप प्लॅन : माथेरान, दापोलो किंवा महाबळेश्वर हे ठिकाण फिरण्यासाठी बेस्ट आहेत.दुसरा वीकेंड२१ ऑक्टोबर (मंगळावर ) : लक्ष्मी पूजन२२ ऑक्टोबर (बुधवार) : दिवाळी पाडवा२३ ऑक्टोबर (गुरुवार ): भाऊबीज२४ ऑक्टोबर ( शुक्रवार) ऑफिसमध्ये सुट्टी टाका२५ आणि २६ ऑक्टोबर ( शनिवार- रविवार) वीकेंडजर तुम्हाला परिवारसोबत दिवाळी सेलेब्रेशन करण्यासाठी जात असाल तर या दिवशी जाऊ शकता..Daily Rashi Bhavishya: 2 ऑक्टोबर रोजी चंद्राधी संयोग! वृषभसह 'या' 5 राशींना मिळणार आहेत अपार लाभ, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य.ट्रिप प्लॅन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टीट्रेन किंवा फ्लाइट्स वेळेवर बुक करासणासुदीच्या काळात गर्दी खूप असते, त्यामुळे तिकीट शेवटच्या क्षणी मिळणं कठीण जाऊ शकतं.हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स आधीच बुक कराशेवटच्या क्षणी बुकिंग केल्यास जास्त खर्च येऊ शकतो किंवा जागा मिळणार नाही.स्थानिक सण-उत्सवांची माहिती घ्याकाही ठिकाणी त्या दिवशी बाजार, रेस्टॉरंट्स किंवा सार्वजनिक स्थळं बंद असू शकतात, त्यामुळे ट्रिपवर परिणाम होऊ शकतो.पर्यावरणाचा विचार कराशक्यतो क्लीन आणि ग्रीन ट्रॅव्हलचा अवलंब करा. प्लास्टिकचा वापर टाळा, स्थानिक वस्तूंचा आदर करा आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्या.स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्याप्रवास करताना सॅनिटायझर, आवश्यक औषधं, आरामदायक कपडे आणि भरपूर पाणी सोबत ठेवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.