Tourism : ऑक्टोबरमधील सणांचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' खास ठिकाणी भेट द्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism news

Tourism : ऑक्टोबरमधील सणांचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' खास ठिकाणी भेट द्या..

मागील महिन्याभराचं काम आणि थकव्यानंतर या महिन्याची १५ तारखी ओलांडली आहे. प्रत्येकवेळी महिन्याच्या सुरुवातील महिन्याभरातील सुट्ट्या मोजल्या जातात. दरम्यान, ऑक्टोबर महिना तुमच्यासोबत अनेक सण आणि अनेक सुट्ट्या घेऊन येतो. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी ट्रिपचा प्लॅन करु शकता. तुमच्या रोजच्या धावपळीच्या कामातून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही या महिन्यातील काही दिवस प्रियजनांसोबत घालवू शकता.

या विशेष महिन्यात भारतभर अनेक सण साजरे केले जातात. या सणाच्या सुट्ट्यांसह तुम्ही इतर सुट्ट्यांचाही आनंद घेऊ शकता. सुट्टीचा हंगाम सुरू होणार असल्याने सर्वत्र प्रवासाचे दरही वाढू लागतील. ऑक्टोबर हा एक असा महिना आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणतीही चिंता न करता तुमच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. कारण या काळात पाऊसपाण्याचे प्रमाणही कमी झालेले असते.

आज या लेखात आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे काही खास वैशिष्ट्ये तुमची सुट्टी आणखी संस्मरणीय आणि मजेदार बनवतील. येथे आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांवरील विशेष गोष्टींची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमची ही सुट्टी तुम्हाला आनंददाने अनुभवता येईल.

नैनिताल

देशातील काही सुंदर ठिकाणांपैकी एक शहर म्हणून याकडे पाहिले जाते. नैनिताल हे भारतातील सर्वांत सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. नैनी तलावावर वसलेले या शहराचे दृश्य हृदयाला भिडणारे आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. मित्र किंवा कुटुंबासहित तुम्ही या ठिकाण जाण्याचा प्लॅन करु शकता. येथील नैसर्गिक दृश्य लोकांच्या मनात उत्साह भरते. ऑक्‍टोबर महिना हा या ठिकाणी जाण्‍यासाठी उत्तम काळ आहे. कारण त्यानंतर काही महिन्यांपासून येथे थंडीची चाहूल लागते.

कैची धाम यात्रा

नैनतालपासून फक्त 20 किमी अंतरावर स्थित एक प्राचीन आश्रम आहे. कैची धाम यात्रा म्हणून ओळखले जाते. 60 च्या दशकातील भिक्षू नीम करोली बाबा यांनी हे धाम बांधले आहे असे मानले जाते. अनेक दिग्गजांनी या आश्रमाला भेट दिली आहे. हे एक पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. येथे आयोजित केलेल्या ध्यान आणि आध्यात्मिक शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात.

अहमदाबाद

अहमदाबाद गुजरात राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. अहमदाबाद हे साबरमती नदीच्या काठावर वसलेले एक महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. एकेकाळी ही गुजरातची राजधानी होती. अहमदाबादला कर्णावती असेही म्हटलं जातं. यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीचा शुभ मुहूर्त असताना तुम्ही या शहराला भेट दिलीत तर हा प्रवास तुम्हाला नवरात्रोत्सवाची वेगळीच मजा देईल. यानिमित्त दांडिया आणि गरब्याचे सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण शहरात सुरू आहेत. लोक पारंपारिक पोशाखात पूर्ण उत्साहाने सहभागी होतात. जर तुम्हाला शहराच्या सांस्कृतिक अनुभवाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही येथे भेट देऊ शकता.

साबरमती आश्रम

साबरमती नदीच्या काठावर वसलेला हा आश्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जिथे ते त्यांच्या विचारांच्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालत आपले कार्य करत होते. महात्मा गांधींनी येथे १२ वर्षे वास्तव्य करुन तेथूनच दांडीयात्रेला सुरुवात केली. आज ते राष्ट्रीय एक स्मारक म्हणून उदयास आले आहे. महात्मा गांधींचे संग्रहालय म्हणून रूपांतरित झाले आहे. येथे गेल्यावर तुम्हाला महात्मा गांधींजींशी संबंधित इतर गोष्टी आणि माहिती जाणून घेता येईल.