One Day Trip Near Pune : पुण्याजवळची विकेंड वन डे ट्रिपसाठी परफेक्ट अशी 5 ठिकाणं

रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून ब्रेक मिळावा यासाठी सगळेच प्रयत्न करतात
One Day Trip Near Pune
One Day Trip Near Puneesakal

One Day Trip Near Pune : विकेंडसाठी ट्रीप प्लॅन करता आहात? पण यावेळेस रविवारी ख्रिसमस पण आला आहे, अशात ख्रिसमस पार्टीचे मित्रांबरोबरचे प्लॅन्स ठरले असतील. म्हणजे कमी थकवणारे आणि एका दिवसात पटकन जाऊन फिरता येतील असे स्पॉट्स तुम्ही शोधत असालच.

One Day Trip Near Pune
Living Room Decoration Ideas : घरातील इंटेरिअर निवडताना काळजीपूर्वक निवडा : इंटेरिअर करतं तणाव कमी

रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून ब्रेक मिळावा यासाठी सगळेच प्रयत्न करतात. विकेंडमध्ये सगळेच बाहेर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात, शांततेच्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करत असतात, अशात तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात.

One Day Trip Near Pune
Amazon Prime Gaming : Amazon ने भारतात लाँच केलं दमदार गेमिंग ॲप! आता गेम खेळा फ्री ऑफ कॉस्ट

1. भाजे लेणी

भाजे लेणी लोणावळ्याच्या मावळ तालुक्यातल्या भाजे गावाजवळच्या डोंगरातली प्राचीन बौद्ध लेणी आहे. इथले चैत्यगृह खूप प्रसिद्ध आहे. बाजूला भिक्षुंना राहण्यांसाठी खोल्या आहेत. इथे एकूण 22 लेण्या आहेत, ज्यात 1 चैत्यगृह आणि 21 विहार आहेत. ही लेणी पर्यटकांसाठीच खूप मोठ आकर्षण आहे; रोज इथे जवळजवळ एक लाख दोन लाख पर्यटक महाराष्ट्राबाहेरूनही येतात. तुम्ही इथे शांत बसून ध्यान करू शकतात.

One Day Trip Near Pune
Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल तयार करा, चॉकलेट अँड आल्मंड रम बॉल

2. लोहगड

लोणावळ्याच्या मळवली स्टेशन जवळ गडांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातले काही महत्वाचे गड म्हणजे लोहगड आणि विसापूर. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोणागड आहे. एकंदरीत चहू बाजूंनी डोंगर रांगांनी आणि गडकिल्ल्यांनी वेढलेला हा गड आहे. तुम्ही इथे नाईट ट्रेकिंग सुद्धा करू शकतात.

One Day Trip Near Pune
Health Insurance: या सरकारी योजनेत मिळतो 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा! ऑनलाइन कार्डसाठी असे करा अप्लाय

3. नेकलेस पॉइंट

नेकलेस पॉईंट हा भोर परिसरातील भाटघर धरणाजवळ आहे. आपल्या भौगोलिकी वैशिष्ट्यामुळे हे सुंदर स्थान बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत. वेळवंडी नदीने घेतलेल्या वळणांमुळे ही नदी एखाद्या नेकलेससारखी दिसते. या ठिकाणाहून आपल्याला नदीचे भव्य दृश्य, नदीमागील शेत आणि डोंगररांगांचे दर्शन घडते. स्वच्छ हवामानात, आपण या ठिकाणाहून रोहिडा किंवा विचित्रगड हा किल्ला देखील बघू शकतो. नेकलेस पॉईंट फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट स्थान आहे. त्यामुळेस बऱ्याच मराठी आणि काही बॉलिवूड सिनेमांमध्ये हा पॉईंट झळकला आहे.

One Day Trip Near Pune
New Year Fashion Trend: न्यू इयर मध्ये असायलाच हवं असं चिकनकरी कुर्त्यांचं परफेक्ट कलेक्शन

4. शिंदे छत्री

शिंदे छत्री ही महादजी शिंदे यांच्या स्मारकासाठी आणि तिथल्या बारीक कोरीवकामासाठी, शिल्पांसाठी ओळखली जाते. नक्कीच एक छान पद्धतीने जतन केलेली रचना आपण या जागेला म्हणू शकतो. शिंदे छत्रीने आपल्या अँग्लो-राजस्थान वास्तुकलेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. मुख्य सभामंडपात महादजींचा चांदीचा पुतळा आहे; इथे असलेलं शंकराच मंदिर खूप सुंदर आहे.

One Day Trip Near Pune
Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

5. खडकवासला

पुणे शहरापासून 20km अंतरावर असलेल्या खडकवासला धरणाकडे सगळेच निसर्गप्रेमी आकर्षित होतात. धरणाच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि तो सगळ्यांनाच आकर्षित करतो. मयूर खाडी, कुडजे गाव, बाहुली गावाजवळ वसलेले नीलकंठेश्वर आणि धरणाच्या सीमेवर असलेला सिंहगड रोड ही पुण्यातील पर्यटकांची आवडती पिकनिक ठिकाणे बनली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com