
How to Plan a Budget Trip to Jammu and Kashmir: उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की वेध लागतात ते उन्हाळी ट्रिपचे आणि त्यातही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचे. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. पण निसर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमींना जम्मू-काश्मीर एकदा तरी अनुभवायचेच असते. बर्फाळ डोंगर, नयनरम्य दृश्य असलेले तलाव, थंड हवामान आणि अनेक धार्मिक स्थळे जम्मू काश्मीरमध्ये प्रसिद्ध आहेत.
पण हिमाचल प्रदेशातील अनेक ट्रिप्सपैकी जम्मू काश्मीरची ट्रिप थोडी महाग वाटते. इतर ठिकाणांपेक्षा इथे बरीच पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे या ट्रिपला जाण्यापूर्वी योग्य नियोजन केले तर ही ट्रिप स्वस्त दरातही करता येते.