
Char Dham online registration: हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खुप महत्व आहे. चारधाम यात्रा सुरू झाली की भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही यंदा चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण चारधाम यात्रेसाठी सर्वात आधी नोंदणी करणे गरजेचे असते. नोंदणीशिवाय प्रवासाला निघाले की प्रवासात त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की नोंदणी का आवश्यक आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे सुरक्षिततेचा विचार करून केले जाते. नोंदणी करून, सरकारकडे प्रत्येक प्रवाशाची माहिती असते, ज्यामुळे कोणत्याही घटनेच्या बाबतीत किंवा कोणाला मदतीची आवश्यकता असल्यास नोंदणीच्या मदतीने त्यांची ओळख पटवणे सोपे होते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करू शकता. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.