
Best Summer Destinations: देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना उन्हाळ्यात हिल्स स्टेशनला फिरायला जायला आवडते. अनेक लोक स्वित्झर्लंडला जातात. पण तुम्हाला बजेटमध्ये हिल्स स्टेशनला फिरायला जायचे असेल तर अरुणाचल प्रदेशातील दिबांग जिल्ह्यात असलेली अनिनी व्हॅलीला भेट देऊ शकता. या ठिकाणाला त्याच्या सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. येथील बर्फाळ पर्वत, घनदाट जंगले, हिरव्यागार दऱ्या आणि थंड हवामान याला एक वेगळी ओळख देते. हे ठिकाण अजूनही अनेक लोकांना माहिती नाही.