Eco Tourism Facilities at 15 Scenic Spots in Pune
sakal
टूरिझम
Pune Eco-Tourism: पुण्याचे पर्यटन होणार अधिक रंगतदार! 'इको टुरिझम' साठी १५ ठिकाणी सुविधा
Sustainable Travel: पुण्यात इको टुरिझमसाठी १५ ठिकाणी नवी सुविधा उपलब्ध – निसर्गाचा आनंद आणि शाश्वत प्रवासासाठी उत्तम संधी.
Pune Travel : जिल्ह्यात 'इको टुरिझम'ला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे १५ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी विविध मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ६० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. प्रथमच अशा प्रकारे नियोजन करून पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात ३०० हून अधिक पर्यटनाची ठिकाणी आहे. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात धबधबे, घाट पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. भोर, राजगड, मुळशी, खेड, जुन्नर आणि मावळ तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनाच्या अनेक संधी आहेत.

