हे आहेत जगातील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानक; बनले आकर्षणाचा केंद्रबिंदू| Railway Station | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेशन

हे आहेत जगातील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानक; आकर्षणाचा केंद्रबिंदू

भारतात प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे रेल्वेला बहुतेक प्रवाशांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जाते. जग काही अतिशय आश्चर्यकारक आणि सुंदर रेल्वे (Railway Station) स्थानकांनी भरलेले आहे. जे स्वतःच एक आकर्षण आहे. ही रेल्वे स्थानके चांगली डिझाइन (Good design) केलेली आहे. यामुळेच जागतिक स्तरावर आर्किटेक्चरल चमत्कार (Architectural miracles) म्हणून ओळखली जातात.

रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी निसर्ग सौंदर्याबरोबर रेल्वे स्थानकांचे सौंदर्यही (Beauty of the stations) डोळ्यांमध्ये साठवत असतात. शहराचे सौंदर्य सांगण्यासाठी रेल्वे हा उत्तम मार्ग मानला जातो. जगात अशी काही आश्चर्यकारक आणि सुंदर रेल्वे स्थानके आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. जे स्वतःमध्ये एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. चला तर जाणून घेऊया अशाच काही स्थानकाविषयी...

मुंबईतील छत्रपती शिवाजी स्टेशन

छत्रपती शिवाजी स्थानक हे मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण आहे. हा एक प्रकारचा वास्तुशिल्प चमत्कार पारंपरिक भारतीय घटक आणि व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचे सुंदर मिश्रण आहे. महाराष्ट्र सरकारने याला ऐतिहासिक वास्तू म्हणून नियुक्त केले आहे.

हेही वाचा: ‘... तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा’

न्यूझीलंडचे ड्युनेडिन स्टेशन

न्यूझीलंडमधील ड्युनेडिन स्टेशन हे देशातील सर्वाधिक छायाचित्रांचे आकर्षण म्हणून प्रसिद्ध आहे. या स्टेशनची निर्मिती १९०६ मध्ये करण्यात आली. तेव्हापासून हे स्टेशन न्यूझीलंडमधील सर्वांत व्यस्त स्थानकांपैकी एक आहे.

लंडनचे सेंट पॅनक्रस इंटरनॅशनल स्टेशन

सेंट पॅनक्रस इंटरनॅशनल स्टेशनचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. या स्टेशनची निर्मिती १८६८ मध्ये करण्यात आली. व्हिक्टोरियन काळातील अभियांत्रिकीचे चमत्कार मानले जाणारे हे स्थानक भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. स्थानकावर मनोरंजनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

जपानच्या इशिकावा येथील कानाझावा स्टेशन

इशिकावा प्रदेशातील हे मुख्य स्थानक आहे आणि दररोज असंख्य हाय-स्पीड ट्रेन येथून धावतात. एक प्रचंड काचेचा घुमट आणि लाकडी गेट दाखवणाऱ्या स्टेशनच्या आधुनिक आणि भविष्यकालीन वास्तुकला पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हेही वाचा: ‘ती आठवण मनात आणली की २० दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल’

इजिप्तच्या कैरी येथील रामसेस स्टेशन

कैरोमधील रॅमसेस स्टेशन हे इजिप्शियन वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे. १९५०च्या दशकात येथे असलेल्या फारो रामसेस II च्या या पुतळ्याच्या नावावरून स्टेशनला नाव दिले.

मलेशियातील क्वालालंपूर येथील उलालंपूर स्टेशन

क्वालालंपूरचे हे स्टेशन त्याच्या भव्य दर्शनी भागासाठी प्रसिद्ध आहे. काच आणि लोखंडी घुमट असलेली ती ठरावीक व्हिक्टोरियन इमारतीसारखी दिसते.

न्यूर्यार्कमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनल

हे जगातील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे स्टेशन त्याच्या सुंदर ब्यूक्स-आर्ट्स आर्किटेक्चरमुळे असंख्य लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले आहे. २० व्या शतकात बांधले गेलेले हे टर्मिनल व्हॉल्टेड सीलिंगसाठी प्रसिद्ध आहे. जे भव्य पेंटिंगमध्ये बनवले आहे. इमारतीच्या अगदी मध्यभागी असलेल्या चार-बाजूचे स्मारक घड्याळ तुम्ही चुकवू शकत नाही.

तुर्कीच्या इस्तंबूल येथील हैदरपासा स्टेशन

हैदरपासा स्टेशनची निर्मिती १९०६ मध्ये झाली. हे स्टेशन ऑट्टोमन साम्राज्य आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीचे प्रतीक होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top