esakal | रामोजी फिल्म सिटीत फिरायला गेला तर 'ही' ठिकाणे आवर्जून पहा
sakal

बोलून बातमी शोधा

ramoji

रामोजी फिल्म सिटीत फिरायला गेला तर 'ही' ठिकाणे आवर्जून पहा

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

हैद्राबाद: तुम्ही अशा शहराचा कधी विचार केला आहे का जे कृत्रिम असूनही तिथं मोठ्या आकर्षक बागा, हॉटेल्स, विवध पदार्थ आणि इतर बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. हो, असं शहर आहे. त्याचं नाव रोमाजी फिल्म सिटी. टॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते रामोजी राव यांनी 1996 मध्ये या फिल्म सिटीची स्थापना केली. चित्रपट तयार करताना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात असा रामोजी राव यांच्या याच्या निर्मित्तीच्या मागे उद्देश होता. रामोजी फिल्म सिटीला जगातील सर्वात मोठा फिल्म सिटी स्टुडीओ असल्याने त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बूकमध्ये नोंदही आहे. चला तर जाणून घेऊया रामोजी फिल्म सिटीबद्दल अधिक...

व्हिंटेज बसमध्ये फिल्म सिटीचा फेरफटका मारता येतो-

रामोजी फिल्म सिटी मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेली आहे. आपण प्रत्येक ठिकाणाला भेट देण्यासाठी व्हिंटेज ट्रॅम्प बुक करू शकता. रामोजी फिल्म सिटीत फिरताना, आपल्याला मुघल, बोनसाई, जपानी, अभयारण्य, सन फाउंटेन आणि अस्करी गार्डन सारखे आकर्षक गार्डनसुद्धा पहावयास मिळतील.

व्हिंटेज बस

व्हिंटेज बस

विंग्स, एक्झोटिक बर्ड पार्क

रामोजी फिल्म सिटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विंग्स, हे एक असे उद्यान आहे जेथे आपल्याला भारतातील आणि परदेशातून आणलेल्या बरेच पक्षी पाहता येतात. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, डेन्मार्क, इटली, इंडोनेशिया, मेक्सिको आणि इतरांसह जगभरातील अनेक देशातील पक्षी या उद्यानात आहेत. दक्षिण अमेरिकेच्या वेटलँडमधील ब्लॅक नेक्ड स्वान, डेन्मार्कमधील म्यूट स्वान, उत्तर अमेरिकेचे ट्रम्पेटर स्वान, आणि आफ्रिकेतील शहामृग हे तुम्हाला विंग्समध्ये दिसतील. याशिवाय मॅका, कोकाटू व तीतरांसह पाण्यात राहणारे पक्षीही येथे दिसतील.

विंग्स, एक्झोटिक बर्ड पार्क

विंग्स, एक्झोटिक बर्ड पार्क

प्रिंसेस स्ट्रीट ऑफ लंडन

हैदराबादमध्ये राहून तुम्हाला लंडनच्या रस्त्यावर फिरायला आवडेल का? होय, आपण बोलत आहोत लंडनच्या प्रिंसेस स्ट्रीट ऑफ लंडन या रस्त्याबद्दल, जो रामोजी फिल्म सिटीमध्ये आहे. उंच इमारती, हवेलीसारखी घरे आणि ग्रीन हिरव्यागार लॉनने भरलेले हे रस्ते आपल्याला लंडनमध्ये असल्याचा भास देतात. इथल्या प्रिन्सेस स्ट्रीटवर बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते. तिथे गेल्यावर बऱ्याच ब्लॉकबस्टर सिनेमांमधल्या सीनची आठवण येते. इथं काही 2 स्टार हॉटेलही आहेत जिथं तुम्ही राहू शकता.

प्रिंसेस स्ट्रीट ऑफ लंडन

प्रिंसेस स्ट्रीट ऑफ लंडन

बाहुबलीचे चित्रपटातील काही क्षण अनुभवा-

बाहुबली हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? या चित्रपटाचा सेट रामोजी फिल्म सिटीमध्येही बनविला गेला होता आणि तो आता तिथेच आहे. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बाहुबली चित्रपटाचे चाहते आता प्रत्यक्षात महिष्मतीचे राज्य पाहू शकतात. बाहुबलीच्या महागड्या सेटमध्ये मूळ खांब, पायऱ्या, भव्य शिल्पे आणि चित्रपटात वापरल्या जाणार्‍या बर्‍याच प्रॉप्स आहेत. बाहुबली फेम देवसेना, कटप्पा, बाहुबली आणि भल्लालदेव या भिंतीवरील प्रमुख पात्रांच्या कलाकृतीपासून ते हत्ती आणि घोडे, शिवलिंग आणि भूमिगत कारागृहापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता

बाहुबलीचे चित्रपटातील काही क्षण अनुभवा

बाहुबलीचे चित्रपटातील काही क्षण अनुभवा

loading image