Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग वीकेंडला भेट देऊ शकता या खास ठिकाणांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day 2023

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग वीकेंडला भेट देऊ शकता या खास ठिकाणांना

Republic Day 2023 : यंदाचा प्रजासत्ताक दिन गुरुवारी आला आहे. यावेळी व्यवस्थित नियोजन केलं तर कुटुंबासोंबत मोठी सुट्टी एंजॉय करू शकता. यासाठी आधी शुक्रवारी सुट्टी घ्यावी लागले. मग शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या वापरून तुम्ही 4 दिवसांच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची योजना बनवू शकता. तुम्ही समुद्रकिनारा किंवा कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्याची योजना करू शकता. या वीकएंड साठी येथे काही ठिकाणे सांगितली आहेत, तुम्हीही या ठिकाणांना भेट देण्यासाठी जाऊ शकता.

हेही वाचा: Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

1. जैसलमेर –

जानेवारीच्या लॉन्गवीकएंड मध्ये तुम्ही जैसलमेरमध्ये फिरायला जाऊ शकता. येथे बडा बाग, सॅम सँड ड्युन्स, पटवन की हवेली, गडीसर तलाव आणि जैन मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देता येते. येथे तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकता.

हेही वाचा: Bill Gates Phone : स्वतःच्या Microsoft कंपनीचा फोन वापरत नाही बिल गेट्स, कारण आहे खास

2.कच्छ –

कच्छ हे गुजरातमध्ये स्थित आहे. भेट देण्यासाठी हे एक छान ठिकाण आहे. तुम्ही विजय विलास पॅलेस, कच्छ म्युझियम, आयना महल, धोलावीरा आणि रन ऑफ कच्छ यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

हेही वाचा: Auto Expo 2023 : आता पाय घासत गाडी चालवण्याची गरज नाही, ही ईव्ही स्कूटर बनणार वृद्धांचा आधार

3.मुन्नार –

हे केरळमधील एक अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे ठिकाण खूप सुंदर आहे. येथे तुम्ही इराविकुलम नॅशनल पार्क, कुंडला तलाव, अट्टुकल धबधबा, चित्रपुरम आणि टी म्युझियम यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

हेही वाचा: Auto Tips : मॅन्युअल गियरची गाडी चालवताना या चुका करू नका, मोठे नुकसान होईल

4.पुरी –

हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. जगन्नाथ मंदिरासाठी ते खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पुरीमध्ये नरेंद्र पोखरी, लोकनाथ मंदिर आणि गुंडीचा मंदिर पुरी येथेही जाता येते.