

republic day weekend 2026 pune places to visit with kids
Sakal
kid friendly places in pune for republic day outing: प्रजासत्ताक दिनाचा वीकेंड हा मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम संधी आहे. रोजच्या धावपळीत मुलांसाठी खास वेळ काढणं कठीण होतं, पण 26 जानेवारीचा सुट्टीचा दिवस कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट आहे. पुणे शहर हे शिक्षण, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असल्यामुळे मुलांसोबत फिरण्यासाठी अनेक उत्तम पर्याय इथे उपलब्ध आहेत. मुलांना मजा तर मिळावीच, पण त्याचसोबत त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासिक ठिकाणे, संग्रहालये, उद्याने आणि किड्स-फ्रेंडली आकर्षणे पाहिल्यास मुलांमध्ये देशभक्तीची भावना रुजण्यासही मदत होते. जर तुम्हीही प्रजासत्ताक दिनी मुलांसोबत आउटिंगचा प्लॅन करत असाल, तर पुण्यातील पुढील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.