पुण्यातील पर्यटन निर्बंध शिथिल; जिल्हा प्रशासनाचं खबरदारीचं आवाहन

जिल्ह्यातील सर्व ठिकाणे पर्यटनासाठी खुली करण्यात आली असली तरी आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सर्व नागरिकांना केले
Restrictions on Tourism Relaxed in Pune District administration appeals to citizens to take precautions
Restrictions on Tourism Relaxed in Pune District administration appeals to citizens to take precautionssakal

सिंहगड: हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा व पर्यटनस्थळी होत असलेल्या गर्दीमुळे वाढलेली अपघातांची संख्या या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक पुणे आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मागणीवरून पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतील गडकिल्ले व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी घातलेले निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ठिकाणे पर्यटनासाठी खुली करण्यात आली असली तरी आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

पावसाचा जोर वाढल्याने व जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने दि. 14 जुलै 2022 पासून 17 जुलै 2022 रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील सात तालुक्यांतील गडकिल्ले, धरणांचा परिसर व इतर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना संबंधित ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या. 18 जुलै 2022 पासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असून संबंधित ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

तालुका/ निर्बंध घालण्यात आलेले ठिकाण

•हवेली /सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक

•मावळ/ लोहगड किल्ला, विसापूर किल्ला,तिकोणा किल्ला,तुंग किल्ला, ड्युक्सनोज, भाजे लेणी,भाजे धबधबा,दुधीवरे खिंड, पवना परिसर,राजमाची ट्रेक, कातळदरा किल्ला व धबधबा , कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकवीरा लेणी परिस.

•मुळशी/अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली,दिपदरा, कोराईगड.

•भोर/रायरेश्वर किल्ला

•वेल्हे/राजगड किल्ला,तोरणा किल्ला, पानशेत धरण परिसर, मढेघाट.

•जुन्नर/जीवधन किल्ला.

•आंबेगाव/ बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट,गणपतीमार्गे).

(वरिल सर्व ठिकाणचे निर्बंध जिल्हा प्रशासनाने उठविले आहेत.)

सिंहगडावरील पर्यटन सुरळीत सुरू........ निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर सिंहगडावरील पर्यटन सुरळीत सुरू झाले आहे. दि. 18 जुलै रोजी सुमारे बाराशे पर्यटकांनी सिंहगडाला भेट दिली. दिवसभरात गोळेवाडी येथील तपासणी नाक्यावर 28,100 रुपये उपद्रव शुल्क जमा झाले. घाट रस्त्यावर पडलेल्या दरडी वन विभागाने काढून घेतल्या असून धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. पर्यटक व दुर्गप्रेमींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे खानापूर वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांच्याकडून सांगण्यात आले.

"पर्यटनावरील बंदी उठविण्यात आली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे अथवा ट्रेकींगसाठी जाणे टाळावे. तसेच सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी उत्साहाच्या भरात जीवघेणे धाडस करु नये. आपत्कालीन परिस्थितीत 112 या नंबरवर मदतीसाठी संपर्क साधावा."

- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com