
थोडक्यात:
सिक्कीममधील याकतेन हे देशातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज म्हणून औपचारिकपणे सुरू करण्यात आले आहे.
या गावात रिमोट वर्कसाठी जलद इंटरनेट, वायफाय, विद्युत बॅकअपसह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
या प्रकल्पामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार असून, स्थानिकांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
Best places for digital nomads in Northeast India: भारताच्या ईशान्यात वसलेल्या तसेच निसर्गाने नटलेल्या सिक्कीम या राज्याचे नाव देशभरात झळकत आहे. भारताच्या डिजिटल आणि पर्यटन धोरणात ऐतिहासिक टप्पा गाठत सिक्किमच्या पाकयोंग जिल्ह्यातील याकतेन गावात देशाचे पहिले ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ आज औपचारिकपणे सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या सल्लागार तथा आमदार पामीन लेप्चा यांच्या हस्ते करण्यात आले.
‘नोमॅड सिक्किम’ या अभिनव योजनेतून उभारण्यात आलेले हे गाव, रिमोट वर्क करणाऱ्या व्यावसायिकांसाठी अत्याधुनिक सुविधा, जलद इंटरनेट, संपूर्ण गावात वायफाय, आणि विद्युत बॅकअपसह तयार करण्यात आले आहे. शहरातील वर्दळीपासून दूर शांत ठिकाणी काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या डिजिटल नोमॅड्सना सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागातील लोकांना उत्पन्नाचा एक नवा पर्याय देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
ही संकल्पना पाकयोंग जिल्हा प्रशासन आणि ‘सर्वहिताय’ या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून साकार झाली आहे. पर्यटकांची गर्दी कमी असलेल्या काळातही स्थानिक होमस्टे मालकांना उत्पन्न मिळावे, या हेतूने या गावाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
याबाबत डॉ. इप्शा जोशी यांनी सांगितले की, "अनेकदा सुटीला आल्यावर देखील विविध रुग्णांचा आरोग्याची समस्या असल्यास फोन येतात. त्यामुळे व्हिडिओ कॉल आदी डिजिटल माध्यमातून रुग्णांची समस्या समजून घेणे सोपो जाते. परंतु अनेकदा इंटरनेट सुविधा नसल्याणे रुग्णांना वेळेत सेवा किंवा वैद्यकीय सल्ला देताना अडचणी येतात. परंतु आता अशा प्रकारच्या सुविधेमुळे पर्यटनाबरोबरच काम देखील करणे सहज आणि सोपे झाले आहे."
विविध संकेतस्थळावरील माहितीनुसार, डिजिटल नोमॅड व्हिलेज म्हणजे अशी एक नियोजित वसाहत किंवा जागा असते जी डिजिटल नोमॅड्स म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून कुठेही राहून काम करणाऱ्या व्यक्तींना राहण्याच्या, काम करण्याच्या आणि एकत्रित राहून नेटवर्किंग व सामाजिक संवाद साधण्याच्या सोयीसाठी खास तयार करण्यात आली असते.
स्थानिक सांस्कृतिक व निसर्गसंपन्न वास्तव्य याचा दुहेरी अनुभव
पर्यटकांना राहण्याची व्यवस्था म्हणून याकतेनमध्ये होमस्टे व्यवस्था
याद्वारे स्थानिक कुटुंबांसोबत राहण्याचा अनुभव
सिक्कीमचे पारंपरिक खाद्य पदार्थ, लोकसंगीत, नृत्य, ट्रेकिंगचा अनुभव
येथे असलेल्या ‘जंडी दारा व्ह्यू पॉइंट’ हे ठिकाण कांचनजंगाच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांना त्याचाही अनुभव
त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम असल्यास निसर्गाचा आनंद घेत काम करण्यासाठी उपलब्ध असणारी इंटरने
डिजिटल नोमॅड व्हिलेज म्हणजे काय? (What is a Digital Nomad Village?)
डिजिटल नोमॅड व्हिलेज ही अशी एक नियोजित जागा असते जिथे इंटरनेट आणि आधुनिक सुविधा असतात, जेणेकरून कुठेही राहून ऑनलाइन काम करणाऱ्या व्यक्तींना राहण्यासाठी आणि कामासाठी अनुकूल वातावरण मिळते.
भारताचे पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज कुठे आहे?
(Where is India's first Digital Nomad Village located?)
भारताचे पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज सिक्कीम राज्यातील पाकयोंग जिल्ह्यातील याकतेन गावात सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा स्थानिकांना काय फायदा होणार आहे? (What are the benefits of this project for locals?)
या उपक्रमामुळे ग्रामीण पर्यटनास चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना होमस्टेद्वारे उत्पन्न मिळेल तसेच त्यांचे पारंपरिक कला, संस्कृती आणि अन्नप्रकार देखील पर्यटकांपर्यंत पोहोचतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.