How to Travel Smart: पर्यटन हा एक आनंददायी अनुभव आहे; परंतु या आनंदात आर्थिक व्यवहारातील काही अडचणी आणि फसवेगिरीचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना योग्य तयारीबाबत काही टिप्स बघूया..प्रवासापूर्वीची तयारीअंदाजे बजेट तयार करा : प्रवासास निघण्यापूर्वी आपला एकूण खर्च, खरेदीसाठी वेगळे बजेट ठरवा. आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करू इच्छिता याची यादी करून घ्या.रकमेचे मिश्रण ठेवा : फक्त कार्डवर अवलंबून राहू नका. रोख रक्कम जवळ बाळगा. कारण अनेक जण कार्ड पेमेंटला नकार देऊ शकतात. रोख रकमेतसुद्धा विविध चलनांच्या नोटांचे किंवा नाण्यांचे मिश्रण ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. छोट्या दुकानांत, रिक्षासाठी किंवा ग्रामीण भागात रोख रक्कम अतिशय उपयुक्त ठरते.डिजिटल पेमेंट अॅप्स तयार ठेवा : यूपीआय (फोन पे, गुगल पे, पेटीएम इत्यादी), मोबाइल वॉलेट इत्यादी अॅप्समध्ये आणि बँक खात्यात पुरेसे पैसे असल्याची खात्री करून घ्या..Diwali Travel Booking: दिवाळीला घरी जायचा विचार करताय? मग रांगेत न थांबता, मोबाईलवरून सोप्या पद्धतीने रेल्वे तिकीट बुक करा!.आर्थिक व्यवहाराबाबत खबरदारीयूपीआयची सुरक्षितता : यूपीआय वापरताना कोणत्याही सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवरून लॉगिन करू नका. तुमच्या मोबाइलचा डेटा वापरा. यूपीआय पिन कोणालाही सांगू नका आणि कोणत्याही संशयास्पद किंवा अज्ञात व्यक्तीला पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका..नेटवर्क समस्यांसाठी तयारी :डोंगराळ, ग्रामीण किंवा रिमोट भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अभाव असू शकतो. अशा ठिकाणी डिजिटल पेमेंट अडकू शकते. म्हणून अशा ठिकाणी जाण्यापूर्वी पुरेसे रोख पैसे बाळगून ठेवा.ऑनलाइन ट्रान्झेंक्शन स्कॅन करा:दररोज तुमच्या बँक स्टेटमेंट किंवा एसएमएसची झटपट नोंद घ्या. कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेस कळवा..Travel Tips for October Heat: ‘ऑक्टोबर हीट’मध्ये प्रवास करत असाल, तर या टिप्स वापरून आरोग्याची घ्या योग्य काळजी .प्रवासानंतरचे व्यवस्थापनबिलिंग स्टेटमेंट तपासा : घरी परतल्यानंतर, प्रवासादरम्यान झालेले सर्व क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI व्यवहार तपासा. कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेस किंवा संबंधित एप्लिकेशनवर तक्रार करा.वस्तूंची यादी करा : खरेदीकेलेल्या सर्व वस्तू आणि त्यांच्या पावत्या एकत्र ठेवा. यामुळे भविष्यातील समस्यांच्या वेळी उपयोग होऊ शकेल..आर्थिक व्यवहारातील सुरक्षा- एकाच ठिकाणी सर्व रोख पैसे ठेवू नका. पाकिटे विभागून ठेवा. हॉटेलच्या सेफ्टी डिपॉझिट बॉक्समध्ये अतिरिक्त रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवा.- पॉइंट-ऑफ-सेल (POS) मशीनवर कार्ड स्वाइप किंवा टॅप करताना, कार्ड आपल्या दृष्टीसमोरच असावे. पिन टाइप करताना दुसरा कोणी पाहत नाही याची खात्री करा.- रात्रीच्या वेळी एकट्याने एटीएममध्ये जाऊ नका. शक्यतो बँकेच्या आत किंवा चांगल्या प्रकाशात आणि लोकवस्ती असलेल्या ठिकाणी असलेले एटीएम निवडा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.